






भाविकांना नम्र आवाहन महाराष्ट्राची वैभवशाली सांस्कृतिक अस्मिता असलेल्या गणेशोत्सवाला राज्य शासनाने राज्य महोत्सव म्हणून दर्जा दिला आहे. महाराष्ट्राच्या या गौरवशाली सांस्कृतिक परंपरेला जागतिक स्तरावर नेणे तसेच महाराष्ट्रातील गणेशोत्सवाला युनेस्कोचा वारसा दर्जा व अन्य जागतिक मानांकने प्राप्त करुन देण्यासाठी राज्य शासनामार्फत व्यापक मोहीम Bappa.org या उपक्रमा अंतर्गत हाती घेण्यात आलेली असून, या उपक्रमामध्ये मंदिर प्रशासनाची महत्वाची भूमिका निर्धारीत करण्यात आलेली आहे. श्री सप्तशृंगी माता मंदिर देश-विदेशातीलं असंख्य भाविकांचे श्रध्दास्थान असून, श्री सप्तशृंगी मातेच्या भक्तीच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना जोडणारे महत्वाचे आध्यात्मिक व सामाजिक केंद्र बनले आहे. पर्यायी दरवर्षी देशाच्या विविध भागातून तसेच परदेशातूनही भाविक श्री सप्तशृंगी मातेच्या मंदिरात दर्शनासाठी येतात. त्यामुळे गणेशभक्ती, महाराष्ट्राची श्री गणेश पंरपरा आणि या परंपरेचे जागतिक स्तरावर सादरीकरण यासाठी या न्यासाची भूमिका अत्यंत महत्वाची ठरु शकते. त्या अनुषंगाने विश्वस्त संस्थेच्या वतीने सर्व भाविक भक्तांना आवाहन करण्यात येते की, आपण देखील सदर उपक्रमात आपल्या श्री गणेश सेवेचा सक्रिय सहभाग नोंदवावा. ही नम्र विनंती...!
मु.पो. सप्तशृंगगड, ता.कळवण, जि.नाशिक - 423501 महाराष्ट्र