
🪔 श्री रासाई उत्कर्ष मंडळ – कुवे मावळत वाडी श्री रासाई उत्कर्ष मंडळ, कुवे मावळत वाडी या मंडळाला यंदा ७४ वर्षांची गौरवशाली परंपरा पूर्ण होत आहे. गेल्या अनेक दशकांपासून मंडळाने सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक उपक्रमांच्या माध्यमातून गावाच्या एकजुटीला बळकटी दिली आहे. मंडळाच्या वतीने गेल्या ३9 वर्षांपासून सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा केला जात आहे. गणेशोत्सवाच्या माध्यमातून ग्रामस्थांमध्ये एकोपा, बंधुभाव आणि सामाजिक बांधिलकीची भावना निर्माण करण्याचे कार्य मंडळ सातत्याने करत आहे. परंपरा, संस्कृती आणि सामाजिक एकतेचा वारसा जपत श्री रासाई उत्कर्ष मंडळ आजही नव्या पिढीला प्रेरणा देत आहे. मंडळाची ही ७४ वर्षांची वाटचाल आणि ३७ वर्षांचा सार्वजनिक गणेशोत्सवाचा प्रवास निश्चितच अभिमानास्पद आहे. श्री रासाई उत्कर्ष मंडळ, कुवे मावळत वाडी रजि. नं. १७७ | सन २०२५
मुक्काम पोष्ट कुवे मावळात वाडी , तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी