bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-04807
महाबली वीर हनुमान 🙏🏻
नाव = रविंद्र तावरे मोबाईल नंबर - 9819108635 पत्ता - एम 502, कासा ईलाईट एम विंग, लेकशोर ग्रीन्स, पलावा फेज २, डोंबिवली, ठाणे - ४२१२०४. 🌺 *आपला विघ्नहर्ता – राम भक्त महाबली हनुमानजींची ध्यानस्थ भव्य प्रतिकृती*🌺 वर्ष – ९ वे वर्ष 🙏🏻 *श्री गणेशाय नमः*🙏🏻 दरवर्षीप्रमाणे यंदाही आम्ही आमच्या गणेशोत्सवात भक्ती, श्रद्धा आणि एक अनोखी संकल्पना यांचा सुंदर संगम साकारण्याचा प्रयत्न केला आहे. यंदाच्या सजावटीची मुख्य संकल्पना आहे — *सदर देखावा हा टाकाऊ पुठ्ठे आणि जुने वर्तमान पत्र आणि सुकलेल्या झाडांच्या फांद्या पासून बनवण्यात आला आहे.* 🔱 *“ध्यान, भक्ती, शक्ती आणि विघ्नहर्त्याच्या कृपेचा दिव्य संगम”* 🔱 या देखाव्यामध्ये *रामभक्त महाबली हनुमानजींची ध्यानस्थ भव्य प्रतिकृती* साकारण्यात आली आहे. त्यांच्या ध्यानमग्न रूपातून *शांतता, संयम, भक्ती, सामर्थ्य आणि आत्मविश्वास* यांचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. संपूर्ण सजावटीमध्ये गूढ आणि आध्यात्मिक वातावरण निर्माण करण्यासाठी *प्रकाशयोजना, नैसर्गिक वेली, पर्वतरूपी पार्श्वभूमी आणि पारंपरिक कलात्मक रचना* यांचा समन्वय साधण्यात आला आहे. या भव्य आणि प्रेरणादायी वातावरणाच्या केंद्रस्थानी विराजमान आहेत आपले लाडके— 🌺🙏🏻 *श्री गणराय – आपला विघ्नहर्ता*🙏🏻🌺 या संकल्पनेतून आम्ही असा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे की— “जिथे श्रद्धा आहे, तिथे शक्ती आहे, जिथे भक्ती आहे, तिथे आत्मविश्वास आहे, आणि जिथे गणरायाची कृपा आहे, तिथे सर्व विघ्नांचा नाश निश्चित आहे.” ✨ *ही सजावट केवळ देखावा नसून श्रद्धा, भक्ती, शक्ती आणि सकारात्मकतेचा अनुभव आहे.* ✨
- Kind
- Story
- Place
- DOMBIVALI
- Art
- Costume and Stagecraft (Nepathya-yoga) · Kala 11
- Contributed by
- रविंद्र सखाराम तावरे
- Submitted
- 22 September 2026
- Accepted
- 22 September 2026
Evidence
This entry is record #4817 in a hash chain of 4,896. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash3d64952a6bc4a10d04f2d745cc446eda6e720c6d6b766e8287ddcb7bfb0f7bd9
Chain head26555ed0c094a20dd8fcf6d883df52b69e06fc9d4a8ce48abfcd71fdb3bb5f54
The chain verifies end to end as of this page load.


