bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-04771
Trishuld ( Trishund)Ganpati Heritage Walkin Pune
पुण्यातील सोमवार पेठेत नागझरी ओढ्याकाठी असलेले त्रिशुंड गणपती मंदिर हे महाराष्ट्रातील अत्यंत दुर्मिळ आणि शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना असलेले पेशवेकालीन मंदिर आहे तीन सोंडा आणि सहा हात: या गणपतीला तीन सोंडा, सहा हात आहेत आणि तो मोरावर आरूढ (बसलेला) आहे.पुण्यातील हा एकमेव तीन सोंडेचा गणपती मानला जातो.गणेशाच्या हातात अंकुश, परशु व मोदकपात्र असून एका हाताने मांडीवर बसलेल्या शक्ती देवतेला आधार दिला आहे. काळ्या पाषाणातील शिल्पकला: संपूर्ण मंदिर काळ्या पाषाणात कोरलेले असून त्यावर सुंदर नक्षीकाम व शिल्पे आहेत.गेंड्याचे शिल्प: मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ साखळीने जखडलेला एकशिंगी गेंडा आणि हातात बंदूक घेतलेले तीन टोपीकर सैनिक यांचे दुर्मिळ शिल्प पाहायला मिळते.तळघर: मंदिराच्या गर्भगृहाखाली तळघर असून, मुख्य मूर्तीवर अभिषेक केल्यानंतर त्याचे पाणी खालील समाधीवर वाहण्याची रचना आहे. हे तळघर सामान्यतः वर्षातून एकदा गुरुपौर्णिमेला भाविकांसाठी खुले केले जाते.
- Kind
- Tradition
- Place
- Pune
- Art
- Architecture (Vāstu-vidyā) · Kala 29
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 22 September 2026
- Accepted
- 22 September 2026
Evidence
This entry is record #4781 in a hash chain of 4,893. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash5f9633d76c971ce42f2b477530d2a40e19e309f82be9849ba839d97fe209018d
Chain head5779f60addd559d8e28fae87791569f4b304b185381c273b280027836c117915
The chain verifies end to end as of this page load.


