bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-04726
Grampanchayat Lamaj

गणपती बाप्पा म्हणजे की मनातली भक्ती, उत्साह, आनंद आणि आपल्या गणपतीसोबत घालवलेले सुंदर क्षण आठवतात. आमच्यासाठी गणपती उत्सव हा केवळ दिवसांचा सण नाही, तर अनेक पिढ्यांना जोडणारी आमच्या कुटुंबाची एक सुंदर परंपरा आहे. सुरुवात २००३ पासून... आमच्या घरच्या गणपतीची सुरुवात २००३ साली झाली. तेव्हापासून आजपर्यंत ही परंपरा तितक्याच प्रेमाने आणि उत्साहाने पुढे चालत आली आहे. वर्षानुवर्षे गणपतीचे स्वरूप, सजावट आणि उत्सवाची पद्धत बदलत गेली, पण बाप्पाबद्दलची श्रद्धा आणि कुटुंबाला एकत्र आणणारा हा उत्सव आजही तसाच आहे. गणपतीच्या उत्सवातील सर्वात खास आणि मनापासून केलेली गोष्ट म्हणजे घरच्या महिलांनी प्रेमाने बनवलेला नैवेद्य. या नैवेद्यात सर्वांची मेहनत, प्रेम आणि भक्ती मिसळलेली असते. संध्याकाळची आरती हा गणपती उत्सवातील सगळ्यात सुंदर क्षण असतो. पेटी, तबला अशा वाद्यांच्या साथीने आरतीचे सूर घरभर घुमतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच आरतीमध्ये सहभागी होतात. गणपतीचे दिवस म्हणजे आमच्या कुटुंबासाठी आनंदाची पर्वणी! पण कदाचित गणपती उत्सवाची खरी सुंदरता याच भावनेत आहे. बाप्पा येतात, आपल्याला एकत्र आणतात, घरात आनंद आणि उत्साह भरतात, असंख्य आठवणी देतात आणि मग निरोप घेतात. २००३ सालापासून आमच्या घरी गणपती बसवत आहे आणि तुटलेली आमच्या कुटुंबाची ही परंपरा आजही प्रेमाने सुरू आहे आणि अशीच पुढच्या अनेक पिढ्यांपर्यंत चालत राहावी, हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. कारण आमच्यासाठी गणपती म्हणजे फक्त एक उत्सव नाही... गणपती म्हणजे आमचे कुटुंब, आमची परंपरा, आमचा आनंद आणि आमच्या असंख्य सुंदर आठवणी. गणपती बाप्पा मोरया! 🙏🌺गणपती बाप्पा म्हणजे की मनातली भक्ती, उत्साह, आनंद आणि आपल्या गणपतीसोबत घालवलेले सुंदर क्षण आठवतात. आमच्यासाठी गणपती उत्सव हा केवळ दिवसांचा सण नाही, तर अनेक पिढ्यांना जोडणारी आमच्या कुटुंबाची एक सुंदर परंपरा आहे. सुरुवात २००३ पासून... आमच्या घरच्या गणपतीची सुरुवात २००३ साली झाली. तेव्हापासून आजपर्यंत ही परंपरा तितक्याच प्रेमाने आणि उत्साहाने पुढे चालत आली आहे. वर्षानुवर्षे गणपतीचे स्वरूप, सजावट आणि उत्सवाची पद्धत बदलत गेली, पण बाप्पाबद्दलची श्रद्धा आणि कुटुंबाला एकत्र आणणारा हा उत्सव आजही तसाच आहे. गणपतीच्या उत्सवातील सर्वात खास आणि मनापासून केलेली गोष्ट म्हणजे घरच्या महिलांनी प्रेमाने बनवलेला नैवेद्य
- Kind
- Story
- Place
- Thane
- Art
- Choral Recitation (Sampāṭhya) · Kala 5
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 22 September 2026
- Accepted
- 22 September 2026
Evidence
This entry is record #4736 in a hash chain of 4,796. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash8287344a658afc56df3e33e3772707eb4f94318b99ef69f554d91bcec3c5a548
Chain head9307074c23ee23091d7d06b6a7423c2014644d5ba5e2e38683ab06e10acfe4e4
The chain verifies end to end as of this page load.


