bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-04715
Abhishek Ravindra Chitnis
Household ganpati decoration theme : आम्ही पण मुंबईकर मुंबईच्या गजबजलेल्या शहरजीवनामागे एक समृद्ध आंतरज्वारीय जैवविविधता दडलेली आहे. याच समुद्रविश्वातील गोनियोब्रँकस बॉम्बेयानस या रंगीबेरंगी समुद्री जीवाची नोंद प्रथम सुमारे १९४६ मध्ये झाली होती. तब्बल ७२ वर्षांनंतर, नोव्हेंबर २०१८ मध्ये Marine Life of Mumbai च्या सदस्यांनी हाजी अलीजवळील टाइड पूलमध्ये त्याचा पुनर्शोध घेतला. याच समुद्री जैवविविधतेचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी चिटणीस कुटुंबाच्या घरी यंदाची गणपती सजावट पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करून साकारण्यात आली आहे. कार्डबोर्ड, जुनी वर्तमानपत्रे आणि पुनर्वापर करता येणाऱ्या साहित्यापासून मुंबईच्या आंतरज्वारीय विश्वाची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. या सजावटीतून समुद्र, खडकाळ किनारे, टाइड पूल आणि विविध समुद्री जीवांचे महत्त्व अधोरेखित केले आहे. वांद्रे, प्रियदर्शिनी पार्क, हाजी अली, दानापाणी, जुहू आणि गोराईच्या किनाऱ्यांवर असंख्य समुद्री जीवांचे अस्तित्व आहे. मात्र प्लास्टिक कचरा, प्रदूषित पाणी, वाढते बांधकाम आणि हवामान बदलामुळे हे विश्व धोक्यात आहे. मुंबईच्या आंतरज्वारीय जैवविविधतेचे संवर्धन म्हणजे केवळ समुद्री जीवांचे संरक्षण नव्हे, तर समुद्रावर अवलंबून असलेल्या संपूर्ण परिसंस्थेचे आणि मुंबईच्या भविष्यातील संरक्षण होय. कारण आम्ही फक्त समुद्री जीव नाही... आम्हीही मुंबईकर आहोत! चलचित्र देखावा . गणपतीचे सजावटीचे साहित्य - वृत्तपत्र , कागद , टिश्यू कागद , पुठ्ठा , नैसर्गिक जलरंग , नारळ करवंटी, चिकण माती इत्यादी . गणपतीची मूर्ती ही शाडू माती वापरून करण्यात आली आहे .
- Kind
- Story
- Place
- Mumbai City
- Art
- Arranging a Chamber (Śayana-racanā) · Kala 41
- Contributed by
- Abhishek Ravindra Chitnis
- Submitted
- 22 September 2026
- Accepted
- 22 September 2026
Evidence
This entry is record #4725 in a hash chain of 4,796. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashb428a37ff14cce4b201c3611dad7ef0b88a8fdca03f1d0e1993c10f308d83aaf
Chain head9307074c23ee23091d7d06b6a7423c2014644d5ba5e2e38683ab06e10acfe4e4
The chain verifies end to end as of this page load.


