bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-04695
तांदळाच्या निवगर्या (तिखट पापडी)निवगर्या
प्रथम एका पितळी पातेले घेऊन त्यात दीड भांडे पाणी उकळत ठेवावे पाण्याला उकळी आली की त्यात थोडे मीठ घालून तांदूळ पिठी घालून व्यवस्थित ढवळावे व हलवत राहणे व थोडे पाणी शिंपडून झाकण ठेवून 15 मिनिटे वाफ आणावी त्यानंतर झाकण काढून उकड मऊ झाली का व हाताला चिकटत नाही ना पहावे चिकटत नसल्यास उकड तयार झाली आहे असे समजावे व गॅस बंद करणे आता उकड गार करण्यासाठी परातीत काढणे, गार झाल्यावर हाताला थोडे तेल व पाणी लावून भाकरीच्या पिठा प्रमाणे मळणे त्यात हिरव्या मिरच्या वाटून केलेले तिखट, थोडे मीठ चवीनुसार, जिरे पावडर एक चमचा , हिंग 1 छोटा चमचा घालून पुन्हा मळणे नंतर छोटे गोळे करून हाताने तो गोळा चपटा करणे (थापणे ) सर्व निवगर्या थापल्यावर भोके असलेली चाळणी घेऊन त्यातून पांढर्या सुती पंचाचे कापड पूर्ण ओले करून थोडे पिळून मग पसरणे व थापलेल्या सर्व निवगर्या पाण्यात बुडवून त्या फडक्यावर ठेवणे व कापड झाकणे आता गॅस चालू करून त्यावर मोदक पात्र किंवा पसरट भांडे ठेवून त्यात पाणी उकळत ठेवावे उकळी आल्यावर त्यावर निवगर्या असलेली चाळणी ठेऊन त्यावर झाकण ठेऊन 15 मिनिटे वाफवणे. व गॅस बंद करून भांडे खाली उतरवावे गार झाल्यावर निवगर्या सर्व करण्यात याव्यात. एक वेगळा पदार्थ आहे जरूर करून बघा
- Kind
- Recipe
- Place
- Pune
- Art
- Cooking (Citra-śāka-pūpa-bhakṣya-vikāra-kriyā) · Kala 42
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 22 September 2026
- Accepted
- 22 September 2026
Evidence
This entry is record #4705 in a hash chain of 4,796. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hasha1b939b285529ecde1c75680ed2d5f2c1b5a96ff35ab2fb8ee20c34e958604e7
Chain head9307074c23ee23091d7d06b6a7423c2014644d5ba5e2e38683ab06e10acfe4e4
The chain verifies end to end as of this page load.


