bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-04629
गोडवा
यंदा आमच्या घरी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या रूपात लाडका बाप्पा आला. आम्ही आधीपासून कोणतीच थीम किंवा प्लॅनिंग केलं नव्हतं. बाप्पा घरी आल्यावर सगळ्यांनी मिळून जागच्या जागी, हाताशी जे मिळालं त्यानेच अगदी मनापासून डेकोरेशन केलं. यावेळची सर्वात भारी गोष्ट म्हणजे बाप्पाचा रोजचा नैवेद्य! आपल्याला जे खायला खूप आवडतं, तेच बाप्पानेही आवडीने खावं असं आम्हाला वाटलं. म्हणून आम्ही रोज वेगवेगळा महाप्रसाद बनवला: पहिला दिवस: मस्त गरमागरम पुरी-भाजी दुसरा दिवस: सगळ्यांची फेव्हरेट पाणीपुरी तिसरा दिवस: आपली अस्सल मासवडी चौथा दिवस: महाराष्ट्राची शान पुरणपोळी पाचवा दिवस: चमचमीत पावभाजी सहावा दिवस: टेस्टी व्हेज पुलाव काही फार मोठे देखावे नसले, तरी घरातल्या सगळ्यांचं एकत्र येणं, बाप्पावरचं प्रेम आणि हा आवडीचा गोड महाप्रसाद यामुळे आमचा हा गणेशोत्सव कायमचा लक्षात राहील असा झाला! प्रेमाने वाढला नैवेद्य आणि भक्तीने सजला दरबार, बाप्पाच्या आगमनाने सुखावला आमचा सारा परिवार! गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया!
- Kind
- Story
- Place
- GHANSOLI
- Art
- Cooking (Citra-śāka-pūpa-bhakṣya-vikāra-kriyā) · Kala 42
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 22 September 2026
- Accepted
- 22 September 2026
Evidence
This entry is record #4639 in a hash chain of 4,774. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash4158944bbe66028d527c954584382005b145318380f5825f19e7d18b502c4294
Chain head88959f153915cd8280653d4ca4433d1639ae0f89663d4f00134d043a25f57c70
The chain verifies end to end as of this page load.


