bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-04584
कथा गणरायाच्या जन्माची

गणपती ही विद्येची देवता आहे. पार्वती मातेने मळापासून गणेशाची मूर्ती तयार केली तो दिवस म्हणजे गणेश चतुर्थी होय. माता आंघोळीला गेलेली असताना रक्षक म्हणून गणेशाला बाहेर उभे केले भगवान श्रीशंकर यांनी प्रवेश करताच गणपती बाप्पांनी त्यांना अडवले तेव्हा क्रोध अनावर होऊन भगवान श्रीशंकरांनी त्याचे मुंडके छाटले पार्वती मातेला हे समजतात त्यांनी आक्रोश केला व माझ्या मुलाला जिवंत करून द्या अन्यथा मी जिवंत राहणार नाही असे सांगितल्यावर शंकर भगवान निघाले रस्त्यात त्यांना हत्तीचे पिल्लू दिसले त्यांनी त्याचे मुंडके छाटून आणले व गणपती बाप्पाला बसवले तो दिवस म्हणजे गणेश जयंती म्हणजे माघी गणेशोत्सव अशी दंतकथा आहे त्यामुळे गणेशोत्सव वर्षातून दोन वेळा साजरा केला जातो . आमच्याकडे भाद्रपद महिन्यातील गणेश जयंतीला गेले 26 वर्ष अखंडपणे बप्पा दीड दिवसासाठी विराजमान होतात. बाप्पांच्या आशीर्वादाने सर्वत्र आनंदाचे व उत्साहाचे वातावरण असते. हिंदू धर्मातील गणेशोत्सव हा अतिशय महत्त्वाचा उत्सव आहे. पारंपरिक पद्धतीने तो साजरा केला जातो. बाप्पाला मोदक खूप आवडतो त्याचप्रमाणे लाडूही खूप प्रिय आहे. गणपती बाप्पाचे सुपा एवढे कान आपल्या सर्वांचे दुःख ऐकून घेतात व त्यांचे हरण करतात म्हणून त्यांना विघ्नहर्ता असेही म्हणतात. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया
- Kind
- Story
- Place
- Thane
- Art
- Staging Plays and Tales (Nāṭikākhyāyikā-darśana) · Kala 9
- Contributed by
- डॉ. विलास विठ्ठल भिसे
- Submitted
- 22 September 2026
- Accepted
- 22 September 2026
Evidence
This entry is record #4594 in a hash chain of 4,595. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash93ecff53ae623c09ff4f5cd8fc10b2d855f4787873c8f4a903872b2758bbbbd9
Chain head612560005b5ae4ea2fa277729344db219f972ed6fdf0ec48e51d948cca493f00
The chain verifies end to end as of this page load.


