bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-04575
गणेश उत्सव

सुपेगाव हे भिवंडी तालुक्यातील सुप्रसिद्ध गाव आहे आमच्या गावात गणपती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो या उत्सवात लहान थोर महीला पुरुष सर्व आनंदाने या उत्सवात सहभागी होतात आणि गणपती सण मोठ्या आनंदाने साजरा करतात गणपती मध्ये भजन किर्तन हरिपाठ नाच गाणे इत्यादी कार्यक्रम आयोजित करण्यात येतात आणआमच्या गावची ओळख म्हणजे वारकरी संप्रदाय मध्ये अग्रगण्य आहे आमच्या गावच वैशिष्ट्य म्हणजे आमच्या गावालगत खुप निसर्गरम्य परिसर आहे आणी गावात गणपती मध्ये भक्तीमय वातावरण निर्माण होतो प्रत्येक घरोघरी जाऊन आणी भजन केले जाते ही जुनी परंपरा खुप वर्षांपासून आहे आमच्या गावात सर्व लोक एकत्रित येऊन आणी गणपती बाप्पाला निरोप देत असताना गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या या घोषाने सर्व लोक गणपतीला निरोप देतात असं आमच्या गावाची परंपरा आता पर्यंत सर्वांनी जपली आहे.
- Kind
- Story
- Place
- Thane
- Art
- Choral Recitation (Sampāṭhya) · Kala 5
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 22 September 2026
- Accepted
- 22 September 2026
Evidence
This entry is record #4585 in a hash chain of 4,702. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash6a23b414b99a4e78bd748aa1725292a92fd0355342d561a9dcb3ab115732a435
Chain headb7f2546507ac7e9dec6e07bdc82552b71570bba788bb6714f89fe5f78fefd64b
The chain verifies end to end as of this page load.


