bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-04555
पाटील घराणाच्या बाप्पाच्या 69 वर्षाची परंपरा
•आमच्या घरी जेव्हा माझे वडील श्री. प्रकाश नारायण पाटील यांचा जन्म दि.11/02/1957 रोजी झाला, तो क्षण संपूर्ण कुटुंबासाठी अथांग आनंद घेऊन आला. वंशाचा दिवा आणि घरात आलेल्या या चिमुकल्या पावलांचे स्वागत करण्यासाठी माझ्या आजोबांनी घरात साक्षात विघ्नहर्त्या गणपती बाप्पांची स्थापना करण्याचा संकल्प केला. •एका बाजूला पुत्राचा जन्म आणि दुसऱ्या बाजूला बुद्धीच्या देवतेचे घरात झालेले आगमन! आजोबांनी हा दुहेरी आनंद साजरा करत पाटील घराण्यात गणपती बाप्पाच्या वार्षिक आगमनाची मोठी परंपरा सुरू केली. •श्री. प्रकाश नारायण पाटील यांच्या जन्माच्या निमित्ताने सुरू झालेली पाटील घराणाच्या बाप्पाच्या 69 वर्षाची मंगलमयी परंपरा आज अखंडपणे सुरू आहे. बाप्पांचे आशिर्वाद आणि वडिलांचे अस्तित्व हे या घराण्याचे सर्वात मोठे सुरक्षा कवच आहे. •"माझे वडील श्री. प्रकाश नारायण पाटील यांच्या जन्माच्या अथांग आनंदात, माझ्या आदरणीय आजोबांनी पाटील घराण्यात गणपती बाप्पाच्या आगमनाची ही मंगलमयी परंपरा सुरू केली. एकाच वेळी घरात आलेल्या या दोन 'प्रकाश' रूपांमुळे आमचे घर भक्ती आणि आनंदाने उजळून निघाले. आज तीच पवित्र परंपरा आम्ही सर्वजण तितक्याच श्रद्धेने पुढे चालवत आहोत."
- Kind
- Story
- Place
- Thane
- Art
- The Art of Memory (Dhāraṇā-mātṛkā) · Kala 62
- Contributed by
- RAJDEEP
- Submitted
- 22 September 2026
- Accepted
- 22 September 2026
Evidence
This entry is record #4565 in a hash chain of 4,703. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash9996325b2172678f7e3c42da12f2bbbd9e2d03bed59fe14ce8d80a7c3563b4e4
Chain heade838debb5c5f2bb137fa20ec35527607ac9997262542d8a4820c404611444466
The chain verifies end to end as of this page load.


