bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-04537
एक गाव एक विसर्जन
*एक गाव, एक विसर्जन - सांगेच्या गणपतीची गोष्ट* सांगे गावात आधी काय होतं, प्रत्येक वाडीचा वेगळा गणपती. कोळीवाडा, बौद्धवाडा, ग्रामपंचायती जवळचा, शाळेजवळचा... एकूण सात गणपती. वर्गणीवरून भांडण, डीजे वरून भांडण, विसर्जन मिरवणुकीत कोण पुढे यावरून भांडण. पावसाळ्यात ओढ्याचं पाणी गढूळ व्हायचं, निर्माल्याने भरायचं. आजी म्हणायची, "देव एकच, पण आपण त्यालाच वाटून टाकलंय." मग 2023 साली सरपंचांनी ठराव मांडला - "यावर्षी पासून एक गाव, एक विसर्जन." सगळे चिडले. "आमची परंपरा मोडणार का?" पण शाळेच्या गुरुजींनी युक्ती काढली. सर्व सात मंडळांनी मिळून एकच मोठी मूर्ती आणायची. मूर्ती मातीची, गावच्याच कुंभाराने बनवलेली. सजावट प्रत्येक वाडीने एक दिवस करायची. वर्गणी एकत्र, हिशोब ग्रामपंचायतीच्या बोर्डावर. गणेश चतुर्थीला गावाच्या मध्यभागी, वडाच्या पारावर तो एकच गणपती बसला. कोळीवाड्याच्या महिलांनी फुलं आणली, बौद्धवाड्याच्या तरुणांनी लाईट लावली, शाळेच्या मुलांनी आरास केली. विसर्जनाच्या दिवशी DJ नाही, फक्त ढोल-ताशा. सात ठिकाणी नाही, एकाच ठिकाणी गाव जमलं. ओढ्यावर एकच मिरवणूक गेली. पाण्यात शाडूची मूर्ती विरघळली, पाणी खराब नाही झालं. त्या दिवशी ओढ्यावर उभ्या असलेल्या म्हाताऱ्या आजीने म्हटलं, "आज खऱ्या अर्थाने गणपती गावातून गेला. भांडण विसर्जित करून." तेव्हापासून सांगे गावात पाटी लागलीय - *आमच्या गावात देव एक, गाव एक, आणि विसर्जनही एक.*
- Kind
- Story
- Place
- Thane
- Art
- Rules of Discipline (Vainayikī vidyā) · Kala 63
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 22 September 2026
- Accepted
- 22 September 2026
Evidence
This entry is record #4547 in a hash chain of 4,597. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash04a9e7a700a3f482c8969bca2e7a6ba17186a181b99fdd4ddc63591aa84cc8b1
Chain head241a8427bebdc68835d307c6102996e5ea86df3cde11079dc170355d9c538e03
The chain verifies end to end as of this page load.


