bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-04521
लाखिवली गावातील घरगुती गणेशोत्सव आणि सांस्कृतिक परंपरा

लाखिवली गावातील घरगुती गणेशोत्सव आणि सांस्कृतिक परंपरा "लाखिवली गावातील घरगुती गणेशोत्सव आणि सांस्कृतिक परंपरा या विषयावर काही शब्द सांगण्याची संधी बाक मिळत आहे, ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. गणेशोत्सव हा केवळ श्री गणेशाच्या पूजेचा उत्सव नाही, तर तो आपल्या श्रद्धेचा, संस्कृतीचा, परंपरेचा आणि एकतेचा उत्सव आहे. भाद्रपद महिन्यात गणरायाचे आगमन होताच संपूर्ण गावात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण होते. लाखिवली गावातील घरगुती गणेशोत्सवाला आपली एक वेगळीच ओळख आहे. अनेक घरांमध्ये गणरायाची भक्तिभावाने स्थापना केली जाते. गणपतीची मूर्ती आणण्यापासून ते विसर्जनापर्यंत प्रत्येक विधीमध्ये कुटुंबातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण उत्साहाने सहभागी होतात. गणरायाची स्थापना झाल्यानंतर दररोज सकाळ-संध्याकाळ आरती, पूजा, नेवेद्य आणि भजन-कीर्तन यामुळे घराघरांत भक्तिमय वातावरण निर्माण होते. गणपतीसमोर सजावट करणे, फुलांची आरास करणे, टांगोळी काढणे आणि प्रसाद वाटणे या परंपरा आजही प्रेमाने जपल्या जातात. या उत्सवाचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे नवीन पिढीला आपल्या संस्कृतीची ओळख करून देणे. आजच्या आधुनिक युगात मोबाईल आणि तंत्रज्ञानाच्या जगात वाढणाऱ्या मुलांना गणेशोत्सवाच्या माध्यमातून आपल्या देव-देवतांची, संस्कृतीची आणि पारंपरिक मूल्यांची माहिती मिळते. लाखिवली गावातील गणेशोत्सव हा एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी होण्याचा आणि गावातील नातेसंबंध अधिक घट्ट करण्याचा प्रसंग देखील आहे. गणपतीच्या निमित्ताने नातेवाईक, मित्रपरिवार आणि गावातील नागरिक एकत्र येतात. त्यामुळे आपुलकी, बंधुभाव आणि सामाजिक एकोपा वाढतो. गणेशोत्सवामध्ये आपल्या लोककला आणि सांस्कृतिक परंपरांनाही महत्त्वाचे स्थान आहे. भजन, कीर्तन, पारंपरिक गाणी, लेझीम, नृत्य, विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि मुलांच्या कला-सादरीकरणातून आपल्या संस्कृतीचा वारसा पुढे नेला जातो. थेट आजच्या काळात आपण गणेशोत्सव साजरा करताना पर्यावरणाचे भान ठेवणेही गरजेचे आहे. थाडू मातीच्या मूर्ती, नैसर्गिक सजावट, प्लास्टिकचा कमी वापर, ध्वनीप्रदूषण टाळणे आणि स्वच्छता राखणे. परंपरा जपूया, संस्कृती वाढवूया, गणरायाच्या आशीर्वादाने लाखिवली गावाची एकता अधिक मजबूत करूया!" गणपती बाप्पा मोरया। मंगलमूर्ती मोरया
- Kind
- Story
- Place
- Thane
- Art
- Rules of Discipline (Vainayikī vidyā) · Kala 63
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 22 September 2026
- Accepted
- 22 September 2026
Evidence
This entry is record #4531 in a hash chain of 4,597. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash15435e5577860b3084a21061f2e8388d8617bef3f2dbbf2a0ad4d69adbfa15b4
Chain head241a8427bebdc68835d307c6102996e5ea86df3cde11079dc170355d9c538e03
The chain verifies end to end as of this page load.


