bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-04515
वारी देखाव्यासह घरगुती बाप्पाची भक्तिमय आरास

आमच्या घरी आषाढ शुद्ध एकादशीनिमित्त संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे आळंदीहून पंढरपूरकडे प्रस्थान दाखवणारा हा देखावा आम्ही साकारला आहे. मध्यभागी बाप्पांची मूर्ती विराजमान असून मागे वारी आणि मंदिराचे मोठे चित्र लावले आहे. बाप्पांच्या समोर हिरवळीवर पालखी सोहळा, लहान वारकऱ्यांच्या प्रतिमा, देऊळ आणि पूजेचे ताट मांडले आहे. वरून पडणाऱ्या दिव्यांच्या प्रकाशात आम्ही हा देखावा अशा भक्तिमय वातावरणात आनंदाने सजवला आहे.
- Kind
- Tradition
- Place
- Thane
- Art
- Costume and Stagecraft (Nepathya-yoga) · Kala 11
- Contributed by
- सई आदेश गायकवाड
- Submitted
- 22 September 2026
- Accepted
- 22 September 2026
Evidence
This entry is record #4524 in a hash chain of 4,597. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash955035492f808fa735be06e72f720cfe69e83231330dcb814fca15b76fdd5a1d
Chain head241a8427bebdc68835d307c6102996e5ea86df3cde11079dc170355d9c538e03
The chain verifies end to end as of this page load.


