bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-04493
Amcha ganpati

2026 मध्ये माझ्या चिंचणी गावातील गणेशोत्सवाला 46 वा वर्ष आहे. चार दशकांहून अधिक काळाची ही परंपरा म्हणजे अनेक पिढ्यांच्या आठवणी, श्रद्धा आणि सहभागाचा वारसा आहे. या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे इथे मूर्ती भव्य नसते आणि वर्गणीची सक्ती नसते. तरीही भक्ती आणि सहभागात कुठेही कमी पडत नाही. विशेष म्हणजे या उत्सवाची संपूर्ण तयारी महिला मंडळाच्या पुढाकाराने केली जाते. महिलांना पूजा-अर्चना आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेता यावा म्हणून अतिशय सुंदर आणि मनाला भावणारी गोष्ट म्हणजे जेवणाची व्यवस्था. अनेकदा गणेशोत्सवात महिला स्वयंपाकघरात व्यस्त राहतात ज्यामुळे कार्यक्रमांचा मनापासून आनंद घेता येत नाही, हा विचार लक्षात घेऊन चिंचणीच्या दीड दिवसांच्या गणेशोत्सवात मंडळ आणि ज्या कुटुंबाला त्या वर्षी मान असेल, त्यांच्या वतीने सामूहिक जेवणाची व्यवस्था केली जाते. कारण उत्सव सगळ्यांचा असेल, तर आनंद घेण्याची संधी सगळ्यांना मिळाली पाहिजे. या काळात वैयक्तिक गणपतीच्या मूर्ती बसवल्या जात नाहीत. त्यामुळे गावातील सर्वजण एकाच बाप्पाच्या उत्सवासाठी एकत्र येतात. जणू बाप्पा एकच, पण भक्त अनेक-आणि भावना एकच! लहान मुलांपासून पुरुष, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व वयोगटांसाठी विविध स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यामुळे प्रत्येकाला आपली कला दाखवण्याची आणि उत्सवात सहभागी होण्याची संधी मिळते. मूर्ती भव्य नसली तरी भक्ती भव्य आहे; सजावट साधी असली तरी सहभाग मोठा आहे; उत्सव दीड दिवसांचा असला तरी आपण वर्षभराच्या आहोत.
- Kind
- Story
- Place
- Palghar
- Art
- Rules of Discipline (Vainayikī vidyā) · Kala 63
- Contributed by
- ashwini raut
- Submitted
- 22 September 2026
- Accepted
- 22 September 2026
Evidence
This entry is record #4503 in a hash chain of 4,596. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash1f73c596a5bcdf4b82407942c3c2b7410496d677c464ce46ea03bd1d7035a4f9
Chain head902f34a1688b3aa7ee76ac02e36adabb2c4b50b75739c357818bd3a19e5949ce
The chain verifies end to end as of this page load.


