bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-04485
कलाश्रीचा बाप्पा

कोविड आजारातून आई आणि पत्नी शेवटच्या स्टेजवरून सुखरूप परत आल्या तो काळ गणेशोत्सवाचा होता तेव्हापासून आम्ही घरात गणपती बसवायला सुरुवात केली आमच्या घराच्या गणपतीचे वैशिष्ट्य हे आहे की पुण्याचा पहिला मानाचा गणपती कसबा गणपती ट्रस्ट यांच्यातर्फे घडवण्यात येणाऱ्या ठराविक मूर्तींपैकी एक मूर्ती दरवर्षी आमचा कलाश्री चा बाप्पा असतो. पुण्यातला पहिला मानाचा गणपती कसबा गणपतीची मूर्ती आम्ही दरवर्षी आमच्या घरी बसवतो. यावर्षी आमच्या गणपतीला पाच वर्षे पूर्ण होतील. दरवर्षी आम्ही असा देखावा करतो. ऐतिहासिक वारसांना उजाळा मिळेल तसेच त्या देखाव्याप्रमाणे वेशभूषा देखील तिथे ठेवलेली असते येणारा प्रत्येक भाविक भक्त त्याप्रमाणे वेशभूषा करून बाप्पाचे दर्शन घेतो.
- Kind
- Story
- Place
- Thane
- Art
- Costume and Stagecraft (Nepathya-yoga) · Kala 11
- Contributed by
- Megharani Dinesh Joshi
- Submitted
- 22 September 2026
- Accepted
- 22 September 2026
Evidence
This entry is record #4495 in a hash chain of 4,596. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashde00dd62d65f57d5e6d696023cbc6be06328d181b4d79c5012190942158cf886
Chain head902f34a1688b3aa7ee76ac02e36adabb2c4b50b75739c357818bd3a19e5949ce
The chain verifies end to end as of this page load.


