bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-04481
आमच्या घरातील पन्नास वर्षे जुना गणपती

आम्ही लहान असल्यापासून आमच्या घरात गणपती उत्सव साजरा केला जातो. उत्सव सुरू व्हायच्या आधीची जी एक प्रकारची गडबड धांदल आतुरता सजावट करणे या दिवस कसे सरतात ते कळत नाही. बाप्पाचे आगमन झाल्यावर घरातील वातावरण प्रसन्न,उत्साही व मंगलमय असते. बाप्पा घरात असेपर्यंतचे चार ते पाच दिवस कसे सरतात ते कळतही नाही.परंतु जसजसा विसर्जनाचा दिवस जवळ येतो हृदयात एक धडधड सुरू होते. मनात पोकळी निर्माण होते.जणू काही आपलाच घरातला कोणी एक सदस्य एक वर्षांकरिता परगावी जात आहे. निरोप देताना खूपच भावुक व्हायला होतं व पुढच्या वर्षीच्या आगमनाची आतुरतेने आतापासूनच वाट बघत राहतो. विसर्जनानंतरही आठ ते दहा दिवस बाप्पाची प्रतिमा सतत डोळ्यासमोर येत असते. श्री. वैभव व नितीन भगवान काठवले. भिवंडी
- Kind
- Story
- Place
- Thane
- Art
- The Art of Memory (Dhāraṇā-mātṛkā) · Kala 62
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 22 September 2026
- Accepted
- 22 September 2026
Evidence
This entry is record #4491 in a hash chain of 4,596. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashc9297ac5d3cbebd370747087c029353116f396119d24ab5d4c4e3dc01850d3af
Chain head902f34a1688b3aa7ee76ac02e36adabb2c4b50b75739c357818bd3a19e5949ce
The chain verifies end to end as of this page load.


