bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-04473
वारघडे परिवारचा बाप्पा- वर्ष 74

आमच्या कुटुंबाची १९५२ पासूनची परंपरा कै. राम बाबू वारघडे यांच्या जन्माच्या आनंदाप्रीत्यर्थ त्यांच्या वडिलांनी, म्हणजेच आमच्या आजोबांनी, सन १९५२ मध्ये प्रथम गणपती बाप्पाची स्थापना केली. त्या वेळी सुरू झालेली ही भक्तीची परंपरा आजही आमच्या कुटुंबात श्रद्धेने आणि भक्तिभावाने जपली जात आहे. सन १९५२ पासून आजपर्यंत अनेक वर्षे आणि अनेक पिढ्या बदलल्या; परंतु गणपती बाप्पावरील श्रद्धा आणि आजोबांनी सुरू केलेली परंपरा कायम राहिली. घरातील सुख-समृद्धी, आरोग्य आणि मंगलकार्यांसाठी श्री गणरायाचे आशीर्वाद लाभावेत, या श्रद्धेने दरवर्षी गणपतीची स्थापना केली जाते. ही केवळ गणपतीची स्थापना नसून, कै. राम बाबू वारघडे यांच्या जन्माशी जोडलेली आमच्या कुटुंबाची भावनिक, धार्मिक आणि सांस्कृतिक आठवण आहे. त्यामुळे १९५२ पासून सुरू असलेली ही परंपरा आमच्या कुटुंबाच्या इतिहासाचा एक महत्त्वाचा ठेवा आहे. “१९५२ पासून सुरू झालेली भक्तीची ज्योत आजही अखंड तेवत आहे — गणपती बाप्पा मोरया!”
- Kind
- Story
- Place
- Thane
- Art
- The Art of Memory (Dhāraṇā-mātṛkā) · Kala 62
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 22 September 2026
- Accepted
- 22 September 2026
Evidence
This entry is record #4483 in a hash chain of 4,596. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashd580a1fe53efb17b03fa61bd0414d3fea0c99d48075665bf547e8bde2ebd1421
Chain head902f34a1688b3aa7ee76ac02e36adabb2c4b50b75739c357818bd3a19e5949ce
The chain verifies end to end as of this page load.


