bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-04432
ग्रामपंचायत दुगाड मधील गणपती उत्सव २०२६.

डोंगराच्या कुशीत विसावलेलं आणि ऐतिहासिक गुमतारा किल्ल्याच्या छायेत असलेलं दुगाड गाव. निसर्गाचं वरदान लाभलेल्या या गावाची शान म्हणजे गावच्या कडेला असलेला तो प्रचंड मोठा तलाव, ज्याच्या संथ पाण्यात अखंड डोंगराची सावली तरंगत असायची. दुगाड गाव जितकं निसर्गरम्य, तितकंच ते आपल्या जुन्या परंपरा आणि संस्कृतीसाठी प्रसिद्ध होतं. गावाची आणखी एक मोठी ओळख म्हणजे तिथे असलेली दोन जुनी आणि अत्यंत सुंदर मंदिरं!काळाच्या ओघात या मंदिरांची थोडी पडझड झाली होती, पण गावातील तरुण पिढीने आपल्या पूर्वजांचा हा वारसा जपायचा ठरवला. शहरात गेलेल्या आणि गावात राहणाऱ्या सर्व तरुणांनी एकत्र येऊन, पैसे जमा केले आणि अपार मेहनत घेऊन या दोन्ही मंदिरांचा जीर्णोद्धार केला. जुनं सौंदर्य तसंच ठेवून त्यांनी या मंदिरांना एक नवं, भव्य रूप दिलं होतं. ही मंदिरं आता केवळ प्रार्थनेचे ठिकाण नव्हती, तर दुगाडच्या तरुण पिढीच्या एकजुटीचे आणि कष्टाचे प्रतीक बनली होती.गावातील घरगुती गणपती उत्सवाचे दिवस आले की या शांत गावाला जणू चैतन्याचे पंख फुटायचे. मुंबई, पुणे किंवा नोकरी-कामानिमित्त बाहेर गेलेली गावातील प्रत्येक व्यक्ती या काळात न चुकता आपल्या मातीकडे धाव घ्यायची. वर्षातून एकदा होणारी ही भेट प्रत्येकाला गावाच्या मुळांशी जोडून ठेवायची. यंदाचाही गणेशोत्सव असाच धूमधडाक्यात सुरू होता. सहा दिवस कसे गेले, हे कोणालाच समजले नाही. आरतीचे नाद, मोदकाचा सुवास आणि घराघरांतून येणारा हसण्या-खिदळण्याचा आवाज यांनी संपूर्ण गाव दुमदुमून गेलं होतं. तरुण मुले सकाळी दोन्ही नवीन मंदिरांमध्ये जाऊन दर्शन घ्यायची आणि मग उत्सवाच्या तयारीला लागायची.अखेर तो निरोपाचा दिवस उजाडला—जेष्ठा गौरी व गणपती विसर्जन!दुपारनंतर संपूर्ण दुगाड गाव तलावाच्या काठावर आणि मुख्य रस्त्यावर एकत्र आलं होतं. विसर्जन मिरवणुकीची सुरुवात तरुणांनी त्याच दोन नूतनीकरण केलेल्या सुंदर मंदिरांना वंदन करून केली. ढोल-ताशांचा गजर सुरू झाला आणि संपूर्ण गावात एकच जल्लोष उसळला. हवेत उडणारा गुलाल, "गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!" असा तरुणांचा सामूहिक जयघोष आणि ताशांच्या कडकडाटावर थिरकणारी पावले... वातावरण अगदी भारावून गेलं होतं.मिरवणुकीत शहरातून आलेले चाकरमानी आणि गावात राहणारे तरुण एकत्र येऊन खांद्याला खांदा लावून नाचत होते. जुने हेवेदावे, थकवा सगळं काही विसरून लोक एकमेकांच
- Kind
- Story
- Place
- Thane
- Art
- Architecture (Vāstu-vidyā) · Kala 29
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 22 September 2026
- Accepted
- 22 September 2026
Evidence
This entry is record #4442 in a hash chain of 4,506. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hasha753046b6e4d22fe1e5980bd44bb5e751d2207ce890bf904ca56e37c0708f408
Chain headb26f34c8e21a35fcf958413c75fa78942c181fdc72d044bc80aac50b4501ec2b
The chain verifies end to end as of this page load.


