bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-04430
चिंचवली कु गणेश उत्सव

चिंचवली कु गावांमध्ये आदर्श गणेशोत्सव संस्कृती, श्रद्धा आणि ऐक्याचा अनोखा संगम , गणेशोत्सव म्हणजे केवळ एक सण नाही, तर तो सांस्कृतिक जपणूक, अध्यात्मिक ऊर्जा आणि सामाजिक एकतेचा भव्य सोहळा असतो. भिवंडी तालुक्यातील चिंचवली ग्रामपंचायत हद्दीतील हेच विलोभनीय रूप दरवर्षी श्री गणरायाच्या आगमनाने अधिकच उजळून निघते. चिंचवली गावात वैयक्तिक गणपती बसविले जातात गावतील सार्वजन मिळून गणरायाची आरती करतात,भजन ,हरिपाठ करतात हे ऐक्याचे प्रतिक आहे. ग्रामपंचायतीच्या हद्दीत एकच महसूल गावांचा समावेश आहे. भौगोलिकदृष्ट्या विविध भागात पसरलेले हे सर्व गावात गणेशोत्सवाच्या काळात मात्र एकाच भक्तीच्या आणि ऐक्याच्या धाग्यात घट्ट बांधले जातात. गावातील लहान-थोर, महिला आणि सर्व जाती-धर्माचे ग्रामस्थ एकत्र येऊन आपल्या लाडक्या गणरायाची अत्यंत श्रद्धेने व भक्तिभावाने पूजा-अर्चा करतात. गणेशोत्सवाचे दिवस संपूर्ण चिंचवली गावात एक वेगळीच अध्यात्मिक ऊर्जा प्रवाहित होत असते. दररोज संध्याकाळी होणारा हरिपाठ, भक्तिमय सुरांमध्ये रंगणारे भजन, प्रबोधनात्मक कीर्तन आणि मूल्यांची शिकवण देणारे प्रवचन यांसारख्या अध्यात्मिक कार्यक्रमांमुळे गावातील वातावरण भक्तीने भारून जाते. या कार्यक्रमांच्या माध्यमातून केवळ अध्यात्माचा प्रसार होत नाही, तर ग्रामस्थांमध्ये संस्कार आणि सकारात्मकतेची पेरणीही होते. अध्यात्मासोबतच सामाजिक जबाबदारीचे भान राखणे ही मोरणी ग्रामस्थांची खास वैशिष्ट्यपूर्ण परंपरा आहे. आजच्या काळात निसर्गाचा समतोल राखणे गरजेचे असताना, चिंचवली येथे पूर्णपणे पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा केला जातो. बाप्पाच्या मूर्तीपासून ते सजावटीपर्यंत निसर्गाची हानी होणार नाही याची काळजी घेतली जाते. उत्सवाच्या माध्यमातून पर्यावरण जतन व संवर्धनाचा हा कृतीशील संदेश संपूर्ण परिसरासाठी मार्गदर्शक ठरत आहे. चिंचवली गावातील गणेशोत्सवाचा सर्वात सुंदर पैलू म्हणजे येथे दिसणारी सामाजिक समता. दिसून येते आरती असो वा प्रसादाचे वाटप, प्रत्येक कार्यात प्रत्येकाचा आवर्जून सहभाग असतो. आपल्या पूर्वजांनी जपलेली ही एकता, अखंडता आणि बंधुभावाची संस्कृती आजचे ग्रामस्थ पुढील पिढीकडे अत्यंत अभिमानाने सोपवत आहेत. आजच्या तरुणांना सहकार्याची आणि संघटन कौशल्याची शिकवण या उत्सवातून आपोआप मिळते. भावनिक निरोप: "चुकले आमचे काही देवा क्षमा असावी..." दिवस कसे न
- Kind
- Story
- Place
- Thane
- Art
- Rules of Discipline (Vainayikī vidyā) · Kala 63
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 22 September 2026
- Accepted
- 22 September 2026
Evidence
This entry is record #4440 in a hash chain of 4,506. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashafa0f8edcc27229b85dec3e68b77ab5d3252663d6a391ac238e26bcb1f8382aa
Chain headb26f34c8e21a35fcf958413c75fa78942c181fdc72d044bc80aac50b4501ec2b
The chain verifies end to end as of this page load.


