bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-04412
सार्वजनिक गणेशोत्सव पिळंझे

परंपरेतून जपलेली भक्ती ,संस्कृती आणि ग्रामएकतेचा गणराया " भिवंडी तालुक्यातील पिळंझे हे गाव ग्रामीण जीवनपद्धती ,शेतीप्रधान संस्कृती आणि ग्रामस्थांना परस्पर सहकार्याची परंपरा जपणारे गाव म्हणून ओळखले जाते.या ग्रामाजीवनात सन-उत्सवाना विशेष महत्त्व असून श्री गणेशोत्सव हा श्रद्धा आणि सामुदायिक सहभागाचा महत्त्वाचा सोहळा आहे .गणपतीची थाटामाटात मिरवणूक काढून मग स्थापना केली जाते.पारंपारिक आरती ,भजन -हरिपाठ करण्यात येतात. गावातील गणेशोत्सवाचे एक विशेष आकर्षण म्हणजे सर्व गणपती एकत्र मिरवणुकीत सहभागी होतात.ढोल-ताशा च्या गजरात गावातील लहान -थोर ,महिला आणि सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन नाचत गाजत मिरवणुकीत सामील होतात.
- Kind
- Story
- Place
- Thane
- Art
- Choral Recitation (Sampāṭhya) · Kala 5
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 22 September 2026
- Accepted
- 22 September 2026
Evidence
This entry is record #4422 in a hash chain of 4,477. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash77bc46e210fdc1ef601fa0b055dbeccaea2a4742aa47675f8da427a2152b1ccb
Chain head00451027390ee05e5b808f973d36323b72cfe2fa6219d9612c9114eda46ffcb0
The chain verifies end to end as of this page load.


