bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-04411
कुसापूर गणेश उत्सव
कुसापूर गाव हे कोयना पुनर्वासाहत गाव असून पुनर्वसन पूर्वीच्या रूढी -परंपरा आजही जोपासल्या जात आहेत.गावाचा आदर्श गणेशोत्सव संस्कृती, श्रद्धा आणि ऐक्याचा अनोखा संगम , गणेशोत्सव म्हणजे केवळ एक सण नाही, तर तो सांस्कृतिक जपणूक, अध्यात्मिक ऊर्जा आणि सामाजिक एकतेचा भव्य सोहळा असतो. भिवंडी तालुक्यातील कुसापूर ग्रामपंचायत हद्दीतील हेच विलोभनीय रूप दरवर्षी श्री गणरायाच्या आगमनाने अधिकच उजळून निघते. कुसापूर गावात वैयक्तिक गणपती बसविले जातात तसेच एक गाव एक गणपती या अनुसंगाने संपूर्ण गावाचा मिळून एक गणपती श्री.कासाई देवी मंदिरात बसविला जातो हे ऐक्याचे प्रतिक आहे. ग्रामपंचायतीच्या हद्दीत एकच महसूल गावांचा समावेश आहे. भौगोलिकदृष्ट्या विविध भागात पसरलेले हे सर्व गावात गणेशोत्सवाच्या काळात मात्र एकाच भक्तीच्या आणि ऐक्याच्या धाग्यात घट्ट बांधले जातात. गावातील लहान-थोर, महिला आणि सर्व जाती-धर्माचे ग्रामस्थ एकत्र येऊन आपल्या लाडक्या गणरायाची अत्यंत श्रद्धेने व भक्तिभावाने पूजा-अर्चा करतात. गणेशोत्सवाचे दिवस संपूर्ण कुसापूर गावात एक वेगळीच अध्यात्मिक ऊर्जा प्रवाहित होत असते. दररोज संध्याकाळी होणारा हरिपाठ, भक्तिमय सुरांमध्ये रंगणारे भजन, प्रबोधनात्मक कीर्तन आणि मूल्यांची शिकवण देणारे प्रवचन यांसारख्या अध्यात्मिक कार्यक्रमांमुळे गावातील वातावरण भक्तीने भारून जाते. या कार्यक्रमांच्या माध्यमातून केवळ अध्यात्माचा प्रसार होत नाही, तर ग्रामस्थांमध्ये संस्कार आणि सकारात्मकतेची पेरणीही होते. अध्यात्मासोबतच सामाजिक जबाबदारीचे भान राखणे ही कुसापूर ग्रामस्थांची खास वैशिष्ट्यपूर्ण परंपरा आहे. आजच्या काळात निसर्गाचा समतोल राखणे गरजेचे असताना, कुसापूर येथे पूर्णपणे पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा केला जातो. बाप्पाच्या मूर्तीपासून ते सजावटीपर्यंत निसर्गाची हानी होणार नाही याची काळजी घेतली जाते. उत्सवाच्या माध्यमातून पर्यावरण जतन व संवर्धनाचा हा कृतीशील संदेश संपूर्ण परिसरासाठी मार्गदर्शक ठरत आहे. कुसापूर गावातील गणेशोत्सवाचा सर्वात सुंदर पैलू म्हणजे येथे दिसणारी सामाजिक समता. दिसून येते आरती असो वा प्रसादाचे वाटप, प्रत्येक कार्यात प्रत्येकाचा आवर्जून सहभाग असतो. आपल्या पूर्वजांनी जपलेली ही एकता, अखंडता आणि बंधुभावाची संस्कृती आजचे ग्रामस्थ पुढील पिढीकडे अत्यंत अभिमानाने सोपवत आहेत. आजच्या तरुणांना स
- Kind
- Story
- Place
- Thane
- Art
- Rules of Discipline (Vainayikī vidyā) · Kala 63
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 22 September 2026
- Accepted
- 22 September 2026
Evidence
This entry is record #4421 in a hash chain of 4,477. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash2abca0c396c2e340c951b02e2bfa0d0bf9b3d51b80839ab12256ebc5f5d53c8b
Chain head00451027390ee05e5b808f973d36323b72cfe2fa6219d9612c9114eda46ffcb0
The chain verifies end to end as of this page load.


