bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-04397
भैरवनाथ गणेशोस्तव मंडळ लोणंद

भैरवनाथ गणेशोत्सव मंडळ, लोणंद यांच्या वतीने यंदाही गणेशोत्सवानिमित्त विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले आहे. मंडळाच्या सामाजिक बांधिलकीच्या परंपरेनुसार यंदा रक्तदान शिबीर आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान शिबीरामध्ये स्थानिक नागरिकांनी व तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने रक्तदान केले. 'रक्तदान हेच श्रेष्ठदान' हा संदेश देत मंडळाने सामाजिक कर्तव्याची जाणीव पुन्हा एकदा जपली आहे. यासोबतच बाप्पाच्या दर्शनासाठी आलेल्या हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. मंडळाच्या या उपक्रमांमुळे केवळ धार्मिक उत्सव न साजरा करता सामाजिक जाणीव जपल्याबद्दल लोणंद शहर व परिसरातून भैरवनाथ गणेशोत्सव मंडळाचे आणि सर्व कार्यकर्त्यांचे विशेष कौतुक होत आहे.
- Kind
- Story
- Place
- Satara
- Art
- Rules of Discipline (Vainayikī vidyā) · Kala 63
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 22 September 2026
- Accepted
- 22 September 2026
Evidence
This entry is record #4407 in a hash chain of 4,461. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashc1ee88c58e5d73e3467ae11d26354a1afcefa20579025b5470972bb9cde8dafa
Chain head847f8b9ec302af48dc38a22e3b77aca117514c54e4d62215367374f597efb197
The chain verifies end to end as of this page load.


