bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-04384
पिंपळासचा राजा (पिंपळास गावचा सार्वजनिक गणेशोत्सव)

गणपती बाप्पा म्हणजे आमच्यासाठी केवळ एक उत्सव नाही, तर श्रद्धा, आनंद, एकोपा आणि गावच्या संस्कृतीची ओळख आहे. वर्षभर आतुरतेने वाट पाहिल्यानंतर बाप्पांच्या आगमनाचा दिवस उजाडतो आणि संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण निर्माण होते. बाप्पांच्या आगमनाच्या दिवशी लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच उत्साह पाहायला मिळतो. ढोल-ताशांचा गजर, फुलांची सजावट, गुलाल आणि “गणपती बाप्पा मोरया!”च्या जयघोषात बाप्पांचे जल्लोषात स्वागत केले जाते. प्रत्येकाच्या मनात एकच भावना असते—आपला बाप्पा आपल्या घरी आणि आपल्या गावात आला! 🙏🏻❤️ बाप्पांच्या आगमनापासून विसर्जनापर्यंत संपूर्ण गावकरी एकत्र येऊन हा उत्सव साजरा करतात. सजावट असो, आरती असो, प्रसाद असो किंवा इतर कोणतेही काम—प्रत्येक जण आपापल्या परीने सहभाग घेतो. कोण मोठा, कोण लहान, कोण श्रीमंत, कोण गरीब असा कोणताही भेद न ठेवता सगळे गावकरी एकत्र येऊन बाप्पांच्या चरणी आपली सेवा अर्पण करतात. या उत्सवामुळे गावातील प्रत्येक घरात आनंदाचे वातावरण असते. लहान मुलांचा उत्साह, तरुणांचा जल्लोष, मोठ्यांचे मार्गदर्शन आणि महिलांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे गणपती उत्सवाला एक वेगळीच शोभा येते. हा उत्सव आम्हाला एक महत्त्वाची गोष्ट शिकवतो—एकत्र राहिलो तर प्रत्येक आनंद अनेक पटींनी वाढतो. बाप्पांच्या निमित्ताने गावातील माणसं एकत्र येतात, जुने राग-रुसवे विसरतात आणि प्रेम, आपुलकी व बंधुभावाने हा उत्सव साजरा करतात. आमच्यासाठी बाप्पांचे आगमन म्हणजे आनंदाची सुरुवात, नव्या आशेची चाहूल आणि संपूर्ण गावाला एका कुटुंबाप्रमाणे जोडणारा उत्सव! गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया! 🙏🏻🌺❤️
- Kind
- Story
- Place
- Thane
- Art
- Rules of Discipline (Vainayikī vidyā) · Kala 63
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 22 September 2026
- Accepted
- 22 September 2026
Evidence
This entry is record #4394 in a hash chain of 4,454. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash8c73ca93bc2c09ff491039b840db3715a019b78217bad2cfb9d9b582a1207ba9
Chain headc6468b47a00b61cdcd64aff74a7c3b7efac0ec17d6d2e1337688c85f3f33f1ad
The chain verifies end to end as of this page load.


