bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-04382
सार्वजनिक गणेश उस्तव देवचोळे

गणपती बाप्पा म्हटलं की मनात भक्ती, उत्साह, आनंद आणि आपल्या माणसांसोबत घालवलेले सुंदर क्षण आठवतात. आमच्यासाठी गणपती उत्सव हा केवळ दिवसांचा सण नाही, तर अनेक पिढ्यांना जोडणारी आमच्या कुटुंबाची एक सुंदर परंपरा आहे. सुरुवात 2002 पासून.. आमच्या मंडळाची गणपतीची सुरुवात 2002 साली झाली, तेव्हापासून आजपर्यंत ही परंपरा तितक्याच प्रेमाने आणि उत्साहाने पुढे चालत आली आहे. वर्षानुवर्षे गणपतीचे स्वरूप, सजावट आणि उत्सवाची पद्धत बदलत गेली, पण बाप्पाबद्दलची श्रद्धा आणि कुटुंबाला एकत्र आणणारा हा उत्सव आजही तसाच आहे. गणपतीच्या उत्सवातील सर्वात खास आणि मनापासून केलेली गोष्ट म्हणजे घरच्या महिलांनी प्रेमाने बनवलेला नैवेद्य, या नैवेद्यात सर्वांची मेहनत, प्रेम आणि भक्ती मिसळलेली असते. संध्याकाळची आरती हा गणपती उत्सवातील सगळ्यात सुंदर क्षण असतो. पेटी, तबला अशा वाद्यांच्या साथीने आरतीचे सूर घरभर घुमतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे आरतीमध्ये सहभागी होतात. गणपतीचे दिवस म्हणजे आमच्या कुटुंबासाठी आनंदाची पर्वणीच! पण कदाचित गणपती उत्सवाची खरी सुंदरता याच भावनेत आहे. बाप्पा येतात, आपल्याला एकत्र आणतात, घरात आनंद आणि उत्साह भरतात, असंख्य आठवणी देतात आणि मग निरोप घेतात 2002 साला पासून आमच्या मंडळाची गणपती बसवत आहे आणि सुरु झालेली आमच्या कुटुंबाची ही परंपरा आजही प्रेमाने सुरु आहे आणि अशीच पुढच्या अनेक पिढ्यांपर्यंत चालत राहावी, हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. कारण आमच्यासाठी गणपती म्हणजे फक्त एक उत्सव नाही... गणपती म्हणजे आमचं कुटुंब, आमची परंपरा, आ आनंद आणि आमच्या असंख्य सुंदर आठवणी. गणपती बाप्पा मोरया!
- Kind
- Story
- Place
- Thane
- Art
- Choral Recitation (Sampāṭhya) · Kala 5
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 22 September 2026
- Accepted
- 22 September 2026
Evidence
This entry is record #4392 in a hash chain of 4,455. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash741a3990ec15a8978cf5dad1462b313fe502f8a5c6cd2b99c67c256108e61af0
Chain headc77000a62e14b1de74184a7b741e93c39aedbedb11b7c76e5198713875fef42a
The chain verifies end to end as of this page load.


