bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-04378
ज्ञान एक्सप्रेस — तंत्रज्ञानाची उत्क्रांती

ज्ञान एक्सप्रेस — तंत्रज्ञानाची उत्क्रांती गणपती बाप्पांच्या सुवर्ण सिंहासनाभोवती फिरणारी आमची ज्ञान एक्सप्रेस पाच युगांचा प्रवास घडवते. पहिल्या स्थानकात पाषाणयुग — गुहा, धबधबा आणि खरोखर पेटणारा अग्नी. दुसऱ्या स्थानकात औद्योगिक युग — वाफेची शक्ती, कारखाने आणि फिरणारे गिअर्स. तिसऱ्या स्थानकात विजेचं युग — जुना रेडिओ आणि दूरदर्शनच्या आठवणी. चौथ्या स्थानकात संगणक युग — खरा की-बोर्ड, फ्लॉपी डिस्क आणि Windows 98. पाचव्या स्थानकात आजचं युग — क्लाउड, IoT आणि AI. बाप्पांची मूर्ती शाडू मातीची असून संपूर्ण देखावा जुन्या वस्तू आणि ई-कचऱ्याच्या पुनर्वापरातून साकारला आहे. Reduce, Reuse & Recreate हाच आमचा संदेश. मोशन सेन्सरवर चालणारी स्मार्ट घंटा भक्तांना तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव देते. ज्ञानाला विवेकाची दिशा मिळाली, तरच ती खरी प्रगती. गणपती बाप्पा मोरया! — शिंपी कुटुंबीय, डॅलस, अमेरिका
- Kind
- Story
- Place
- डॅलस , टेक्सास , अमेरिका
- Art
- Mechanical Devices (Yantra-mātṛkā) · Kala 32
- Contributed by
- वैशाली शक्तीप्रसाद शिंपी
- Submitted
- 22 September 2026
- Accepted
- 22 September 2026
Evidence
This entry is record #4388 in a hash chain of 4,454. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashc0c94bc05b707d24c836d89c05350e7e3dc1f3740214cbafd50c79d79ecdd490
Chain headc6468b47a00b61cdcd64aff74a7c3b7efac0ec17d6d2e1337688c85f3f33f1ad
The chain verifies end to end as of this page load.


