bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-04369
पृथ्वीची परिक्रमा
एकदा काही देव आपली समस्या घेऊन भगवान शंकरांकडे आले. त्यावेळी त्यांच्यासोबत माता पार्वती, गणेश आणि कार्तिकेय देखील बसले होते. भगवान शिवांनी आपल्या दोन्ही मुलांकडे पाहून विचारले यांच्या समस्यांचे तुमच्यापैकी कोण निवारण करु शकेल? त्यावेळी गणेश आणि कार्तिकेय या दोघांनी आपण सक्षम असल्याचे सांगितले. त्यांचा तो आत्मविश्वास पाहून भगवान शिवांनी त्यांची परीक्षा घेण्याचे ठरवले. भगवान शिव म्हणाले, ‘जो सगळ्यात आधी पृथ्वीची परिक्रमा पूर्ण करुन येईल. तो हे कार्य करण्यास सक्षम आहे असे मी समजेन. शंकराची आज्ञा मानून कार्तिकेय मोरावर बसून पृथ्वीच्या परिक्रमेसाठी निघून गेला. पण गणेश मात्र तिथेच होता. त्याने विचार केला या उंदरावर बसून पृथ्वीची परिक्रमा मी काही जिंकू शकणार नाही. त्याने थोडासा विचार केला. शंकर पार्वती जेथे बसले होते त्यांच्याभोवती सात फेऱ्या मारुन त्याने आपली पृथ्वी परिक्रमा पूर्ण केली. दुसरीकडे कार्तिकेय आपली पृथ्वी परिक्रमा करुन आल्यानंतर मी विजेता असल्याचे सांगितले. त्यावेळी भगवान शंकरांनी गणेशाला पृथ्वी परिक्रमा न करण्याचे कारण विचारले. त्यावेळी तो म्हणाला की, आई-वडिलांच्या चरणीच समस्त पृथ्वी सामावली आहे. तर परिक्रमेची गरज काय? गणेशाचे ते बोलणे ऐकून त्यांना आनंद झाला. देवांवरील संकट निवारणाची जबाबदारी ही भगवान गणेशांकडे देण्यात आली. जो कोणी चर्तुर्थीच्या दिवशी भगवान गणेशाची पूजा करेल आणि रात्री चंद्राला अर्घ्य देईल त्याची सगळ्या दु:खातून मुक्ती होईल.
- Kind
- Story
- Place
- Raigad
- Art
- Staging Plays and Tales (Nāṭikākhyāyikā-darśana) · Kala 9
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 22 September 2026
- Accepted
- 22 September 2026
Evidence
This entry is record #4379 in a hash chain of 4,456. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash142e25f1381683daf0a9be0786253fc6da1e7c37fb0954dcc46a0da0ebf040ed
Chain headfa2a0af9e9cb5d0ea55d255d359ee0883d72d86b56c95fcd38acb9e2e899aca3
The chain verifies end to end as of this page load.


