bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-04364
🌺 काल्हेर गावाचे गणेशोत्सव : भक्तीच्या रंगात रंगलेली एकजुटीची परंपरा* 🌺
काल्हेर गाव, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे — विविधतेतून एकता जपणारे आणि आपल्या परंपरांचा अभिमानाने वारसा पुढे नेणारे हे गाव. काल्हेर ची ओळख एखाद्या एका वैशिष्ट्यापुरती मर्यादित नाही. गावकऱ्यांमधील जिव्हाळा, सामाजिक एकोपा, क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी आणि कलाविष्काराची परंपरा यामुळे या गावाने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. गणेशोत्सव आला की या एकतेला आणखी सुंदर रूप प्राप्त होते. घराघरांत बाप्पाचे आगमन होते, प्रत्येक कुटुंब आपापल्या पद्धतीने गणरायाची आराधना करतात त्याच प्रमाणे देशाच्या कानकोपऱ्यातून गावामधील निवासी सॊसायटी मध्ये राहायला आलेले विविध प्रांतातील, विविध जातीधर्माचे, भिन्न बोली बोलणारे, भिन्न संस्कृती असणारे सर्व लोक गावामधील स्थानिकांप्रमाणेच एकत्र येऊन विविध सण उत्सव साजरे करत असतात त्याच प्रमाणे आप आपल्या सोसायटी मध्ये गणेशोत्सवादरम्यान गणरायाची स्थापना करून दीड दिवसापासून ते दहा दिवसापर्यंत गणेशाची मोठया भक्तीभावाने सेवा व आराधना करतात त्याच प्रमाणे या दिवसात विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात येतात. भक्तीसोबत पर्यावरणाची जाणीव काल्हेर च्या गणेशोत्सवात श्रद्धेबरोबरच पर्यावरणाची काळजी घेण्याची जाणीवही दिसून येते. विशेषतः गावातील शाडू मातीच्या गणेशमूर्तींची परंपरा ही या दृष्टिकोनाला अधिक अर्थपूर्ण बनवते. गावातील प्रसिद्ध मूर्तिकार आपल्या कौशल्याने शाडू मातीला आकार देतात आणि त्यातून देखण्या गणेशमूर्ती साकारतात. ही कला म्हणजे केवळ व्यवसाय नाही, तर पिढ्यान्पिढ्या जपलेली स्थानिक कलापरंपरा आहे. मातीपासून साकारलेला बाप्पा आणि त्याच मातीत परत विलीन होणारा गणराय — यातून निसर्गाशी असलेले आपले नातेही अधोरेखित होते. गणेश मूर्तीचे विसर्जनाला गावातील रेती बंदर घाट येथे केले जाते विसर्जनासाठी सर्व आवश्यक सोयी सुविधा गावातील जेष्ठ नागरिक यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राम पंचायत मार्फत पुरविण्यात येतात, विसर्जनासाठी कृत्रिम तलावाची सुद्धा व्यवस्था केली जाते “गणराया एक, उत्सव एक आणि मनंही एक हीच काल्हेर गावाची खरी परंपरा!” शब्दांकन *श्री. रमेश बाळू राठोड *ग्रामपंचायत अधिकारी काल्हेर
- Kind
- Story
- Place
- Thane
- Art
- Rules of Discipline (Vainayikī vidyā) · Kala 63
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 22 September 2026
- Accepted
- 22 September 2026
Evidence
This entry is record #4374 in a hash chain of 4,456. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hasha67220924755ccc5cc8ecceb051b20fc0a5314e7e34b881348e30489160f6a3c
Chain headfa2a0af9e9cb5d0ea55d255d359ee0883d72d86b56c95fcd38acb9e2e899aca3
The chain verifies end to end as of this page load.


