bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-04350
आमच्या घरचे बाप्पा म्हणजे माझ्या बाबांची आठवण
🙏🏻 आमच्या घरचा गणपती… एक परंपरा, एक आठवण आणि बाबांचा आशीर्वाद 🙏🏻 माझ्या जन्मापासूनच आमच्या घरी गणपती बाप्पांचे आगमन होत आले आहे. ही केवळ एक धार्मिक परंपरा नव्हती, तर आमच्या घरच्या आनंदाचा आणि एकोप्याचा एक अविभाज्य भाग होता. माझे बाबा दरवर्षी मोठ्या भक्तिभावाने गणपती बाप्पांची स्थापना करायचे. पूर्वी आमच्या घरी दहा दिवसांचा गणपती असायचा. त्या दहा दिवसांत घरात एक वेगळेच चैतन्य असायचे… सकाळ-संध्याकाळची पूजा, आरती, प्रसाद आणि घरातील सर्वांच्या चेहऱ्यावरचा आनंद… जणू बाप्पांच्या आगमनाने आमच्या घराला एक वेगळेच रूप यायचे. ❤️ पण 2012 साली बाबांचे निधन झाले आणि आमच्या आयुष्यातील एक मोठी पोकळी निर्माण झाली. बाबा गेले, पण त्यांनी सुरू केलेली गणपती बाप्पांची परंपरा मात्र थांबू नये, असे मनापासून वाटले. म्हणून त्यांच्यानंतर ही जबाबदारी मी स्वीकारली. आजही दरवर्षी मी आमच्या घरी गणपती बाप्पांची स्थापना करतो. पूर्वी दहा दिवसांचा गणपती असायचा, आता पाच दिवसांचा गणपती असतो… पण भक्ती, श्रद्धा आणि भावना मात्र तितक्याच आहेत. मला नेहमी असे वाटते की, बाप्पांच्या रूपाने बाबांची आठवण आणि त्यांचे आशीर्वादही आमच्या घरात येतात. 🙏🏻 गणपती बाप्पा घरी आले की वातावरणच बदलून जाते. घरातील प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो, घरात हर्षोल्हासाचे वातावरण निर्माण होते आणि काही दिवसांसाठी का होईना, सर्व चिंता बाजूला ठेवून आपण फक्त आनंद साजरा करतो. कदाचित म्हणूनच आमच्यासाठी गणपती म्हणजे केवळ देव नाही… गणपती म्हणजे बाबांनी दिलेली एक सुंदर परंपरा, गणपती म्हणजे कुटुंबाला एकत्र आणणारी भावना, गणपती म्हणजे घरातील आनंद, आणि गणपती म्हणजे बाबांची आठवण… ❤️ बाबांनी सुरू केलेली ही परंपरा मी पुढे नेत आहे आणि माझी मनापासून इच्छा आहे की ही परंपरा पुढच्या पिढ्यांनीही अशीच जपावी. बाप्पा, आमच्या घरावर आणि आमच्या संपूर्ण कुटुंबावर तुमची कृपादृष्टी सदैव राहू दे. आमच्या घरात सुख, शांती, समाधान, आरोग्य आणि प्रेम सदैव नांदू दे. 🙏🏻 गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया! ❤️🙏🏻
- Kind
- Story
- Place
- Chandrapur
- Art
- The Art of Memory (Dhāraṇā-mātṛkā) · Kala 62
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 22 September 2026
- Accepted
- 22 September 2026
Evidence
This entry is record #4360 in a hash chain of 4,368. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash61d4664817094f9ba492aba3b1d1c4bfcab6c3d69f33faa5edf1eecaf419ed5b
Chain headcb2a62cae84052ab4b6c01b0d3a3b2844e81963165a65a4893a2b7ad6f7c0022
The chain verifies end to end as of this page load.


