bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-04346
Swami Ramdas krut Ganesh Vandana

*गोसावी मंदिराच्या प्रवेशद्वारी ९०० वर्षे जुन्या गणेशमूर्तींचा पहारा!* *डॉ सुवर्णा हुबेकर* *भंडाऱ्यातील ऐतिहासिक स्थळाला मिळाली नवी ओळख* *भंडारा :*एक अनोखी गणेश कथा: शहरातील मेंढा-नेंबर्ड वॉर्ड परिसरातील अति-प्राचीन श्री विष्णू मंदिर, गिरी गोसावी मठ व स्मारक परिसर भंडाऱ्याच्या प्राचीन वैभवाची साक्ष देत आहे. सुमारे ९०० वर्षांपूर्वीच्या या मंदिर समूहाच्या मुख्य प्रवेशद्वारावर आजही विविध रूपातील प्राचीन गणेशमूर्ती लक्ष वेधून घेतात. प्रवेशद्वारावर चतुर्भुज द्वार गणपती, काळ्या पाषाणातील षड्भुज महागणपती, नृत्य गणपती, ललाट गणपती आणि सुंदरी गणपती अशा मूर्ती विराजमान आहेत. तत्कालीन शिल्पकारांनी दगडात साकारलेली ही गणेशरूपे धार्मिक श्रद्धेसोबतच त्या काळातील शिल्पकलेची प्रगल्भता अधोरेखित करतात. प्रवेशद्वारावरील गणेशमूर्ती विघ्नाचा अडथळा रोखणारे द्वारस्थ म्हणूनही मानल्या जातात. हेमाडपंथी स्थापत्याची वैशिष्ट्ये असलेल्या या वास्तूत बलुआ दगडाचा वापर करण्यात आला असून, चुन्याविना इंटरलॉक पद्धतीने बांधकाम केल्याचे सांगितले जाते. सूक्ष्म नक्षीकामामुळे परिसराला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. मंदिरातील गर्भगृहातील भूषंड गणपतीची मूर्ती विश्वभरीतील अष्टविनायकांपैकी एक मानली जाते. दीड एकर परिसरात पसरलेल्या या *स्थापत्याचा अनोखा नमुना* हेमाडपंथी वास्तुशैलीच्या या मंदिर समूहात बलुआ दगडांचा वापर करण्यात आला आहे. चुन्याशिवाय इंटरलॉक पद्धतीने आराखलेल्या बांधकामावर सूक्ष्म नक्षीकाम आढळते. तत्कालीन कारागिरांचे स्थापत्यज्ञान या रचनेतून स्पष्टपणे जाणवते. वारसाकडे काही वर्षांपूर्वी दुर्लक्ष झाले होते. समाजसेवी व इतिहास अभ्यासक मोहम्मद सईद शेख यांच्या पाठपुराव्यामुळे आता पुरातत्व विभागाकडून वैज्ञानिक पद्धतीने *संतांच्या समाध्यांचाही ठेवा* मंदिर परिसरात सात संतांच्या समाध्या आहेत. गोसावी समाजाच्या नऊ पिढ्यांच्या श्रद्धेशी या समाध्या जोडलेल्या आहेत. त्यामुळे हा परिसर केवळ मंदिर वास्तू न राहता साधू-संतांच्या परंपरेचे आणि स्थानिक धार्मिक इतिहासाचे महत्त्वपूर्ण स्मृतिस्थळ ठरतो. जीर्णोद्धाराचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे भंडाऱ्याच्या या ऐतिहासिक ठेव्याला नवसंजीवनी मिळण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे. डॉ सुवर्णा हुबेकर गोंदिया
- Kind
- Tradition
- Place
- Beed
- Art
- Architecture (Vāstu-vidyā) · Kala 29
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 22 September 2026
- Accepted
- 22 September 2026
Evidence
This entry is record #4356 in a hash chain of 4,399. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashf806dd4ecfe9b1aaf7acab78f492bd7624de8afbd541b4f8c37c1def9dc489cb
Chain head761effba21ecaab8529352eabdbdcdd80589dbd797706a0072bf361309529d8a
The chain verifies end to end as of this page load.


