bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-04341
पर्यावरणपूरक देखाव्यातून दुष्काळग्रस्त बळीराजाची व्यथा

आमच्या घरी आम्ही प्रदूषणमुक्त आणि टाकाऊ वस्तूंपासून ही सजावट केली आहे, ज्यातून दुष्काळात पावसासाठी व्याकुळ झालेला बळीराजा दाखवला आहे. आमचे गणपती बाप्पा सुकलेल्या गवतापासून तयार केलेल्या एका छोट्या कुटीमध्ये विराजमान आहेत. मागे दुष्काळी परिसराचे चित्र असून बाजूला आकाशाकडे पावसाची वाट पाहत उभा असलेला शेतकरी, मोर आणि हिरवी पाने सजवली आहेत. बाप्पाच्या आसनाभोवती सुंदर जरीचे वस्त्र आणि झेंडूच्या माळा लावल्या आहेत. अशा सामाजिक संदेश देणाऱ्या देखाव्यासह आम्ही यंदा बाप्पाचे स्वागत केले आहे.
- Kind
- Story
- Place
- Satara
- Art
- Arranging a Chamber (Śayana-racanā) · Kala 41
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 22 September 2026
- Accepted
- 22 September 2026
Evidence
This entry is record #4351 in a hash chain of 4,359. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashe4013ab64ef45b94341826abae5406f7c48f75cf047eea9897d202cebe7a2b5e
Chain head9c49d00a813934abe2e6a33e3321f3c2df3e360a7ce946dcb2c09fe75ec5c853
The chain verifies end to end as of this page load.


