bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-04297
Bhinar

भिणार गावातील गणपती उत्सव भिणार गावात गणपतीचा सण मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा केला जातो. गणेश चतुर्थीच्या दिवशी घराघरांत आणि सार्वजनिक मंडळांमध्ये गणपती बाप्पांची स्थापना केली जाते. गणपतीची सुंदर सजावट आणि आकर्षक रोषणाई केली जाते. दररोज सकाळी आणि संध्याकाळी गणपतीची आरती केली जाते. गावातील लहान मुले, तरुण आणि ज्येष्ठ नागरिक उत्साहाने विविध कार्यक्रमांत सहभागी होतात. भजन, कीर्तन, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. गणपतीला मोदक, लाडू व इतर प्रसाद अर्पण केला जातो. या उत्सवामुळे गावात एकोपा, प्रेम आणि बंधुभाव वाढतो. गणपती विसर्जनाच्या दिवशी ढोल-ताशांच्या गजरात आणि “गणपती बाप्पा मोरया”च्या जयघोषात मिरवणूक काढली जाते.
- Kind
- Story
- Place
- Thane
- Art
- Choral Recitation (Sampāṭhya) · Kala 5
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 21 September 2026
- Accepted
- 21 September 2026
Evidence
This entry is record #4307 in a hash chain of 4,311. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashe97788df29abd95b0d93185e61723c1bd9187446db6ef560e01f1ef2ad06d126
Chain head1efeac8f7e29611ce87dbc688dd4513d0b6ae0126a9389f5d82c308fcb1ea885
The chain verifies end to end as of this page load.


