bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-04284
Menawali Ghat and Nana Phadanvis wada
वाईपासून धोम धरणाकडे जाण्याच्या वाटेवर ४ ते ५ किलोमीटरच्या अंतरावर मेणवली गाव आहे. एका बाजुला पांडवगड तर दुसऱ्या बाजुला पाचगणीला घेऊन जाणारा पसरणीच्या घाटाचा रस्ता आणि त्या दोघांमधून वाहणारी कृष्णा नदी. संथ वाहणारी कृष्णा नदी, आजूबाजूस असणारी दाट गर्द हिरवीझाडी, निरव शांतता मनाला मोहून टाकते. कृष्णा नदीवरील घाट पाहून मन प्रसन्न होते... येथील घाट शांत व सुंदर आहे. येथे बांधण्यात आलेला घाट हा चंद्रकोराकृती आहे. येथे दोन मंदिरे आहेत. एक विष्णू देवाचं आणि दुसरं मेनेश्वराचं (शंकराचं). या मंदिरातील गर्भगृहात पायऱ्या उतरून खाली जावे लागते. येथे ६ ते ७ फुट खाली शिवलिंग आहे. या मंदिरासमोरील एका मंडपात एक अजस्त्र घंटा बांधलेली आहे. श्रीमंत चिमाजी अप्पा पेशवे यांनी वसईच्या किल्ला जिंकल्यानंतर विजयाची आठवण राहावी म्हणून तेथील चर्चमधील घंटा येथे आणली आहे. यावर १७०७ असा उल्लेख आहे. घंटा पंचधातूची असून त्यावर मदर मेरी ची प्रतिमा आहे. पेशवाईतील फारसे वाडे शिल्लक नाहीत आणि असले तर त्याची अवस्था चांगली नाही, पण वाईजवळ मेणवली येथील हा वाडा अजुनही सुस्थितीत आहे. नाना फडणवीस यांना वाईच्या पश्चिमेकडील भाग भगवानराव त्र्यंबक पंतप्रतिनिधी यांनी इनाम म्हणून दिला. त्यांनी १७६८ मध्ये मेणवली हे टुमदार गाव वसवले आणि कृष्णा नदीच्या काठावर एक चौसोपी दोन मजली वाडा बांधला. वाड्यात वाईतील महागणपतीची प्रतिकृती, कारंजे, विहीर, पोटमाळा आणि इतर अनेक सोयी असे काम केलेले आहे. संपूर्ण वाड्याला दगडी तट बांधलेला आहे. वाड्यात नेहमीच्या सोयी व्यतिरिक्त एक नानांचा छोटा दरबार, त्याच्या शेजारी एक विश्राम कक्ष आहे. दरबारात जाण्यासाठी एक लपलेला अरुंद जिना आहे आणि चोर वाटेने घाटावर जाण्याची सोय आहे. नानांनी या वाड्यात बरीच मोडी लिपीतील कागदपत्रे आणि इतर किमती साहित्य हलवले होते. ते आता 'मेणवली दप्तर' म्हणून ओळखले जाते. हिंदी, मराठी अशा अनेक मालिका आणि ५० पेक्षा जास्त चित्रपटांचे चित्रीकरण या ठिकाणी झाले आहे. 'स्वदेस' चित्रपटात शाहरुख खान ज्या नदी काठी बसतो तोच हा मेणवलीचा नदीकाठ. असा हा निसर्गरम्य घाट आणि वाड्याची वस्तू पाहून बाप्पालाही रहावले नाही. तोही आपल्या मूषकांना घेऊन घाटावर आला आणि भली मोठी घंटा हाती घेऊन वाजवू लागला. ते पाहून मूषक स्पर्धा करु लागले, कोण घंटा आधी पकडतो, आता पाहूया कोण जिंकतो ते.... जि
- Kind
- Tradition
- Place
- Satara
- Art
- Architecture (Vāstu-vidyā) · Kala 29
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 21 September 2026
- Accepted
- 21 September 2026
Evidence
This entry is record #4294 in a hash chain of 4,294. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash9850ae9df0ed42b53df2c982bb5ade9e04d1d5957dbc728f6875d842172f0fa5
Chain head9850ae9df0ed42b53df2c982bb5ade9e04d1d5957dbc728f6875d842172f0fa5
The chain verifies end to end as of this page load.


