bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-04283
गोकर्णाच्या फुलांचे मोदक
🌸 गोखरणाच्या फुलांचे ब्लू मोदक कृती 1. सर्वप्रथम २५ गोखरणाची फुले स्वच्छ धुऊन घ्या. ती पाण्यात उकळून त्यांचा सुंदर नैसर्गिक निळा रंग पाण्यात उतरवून घ्या. त्यानंतर फुले गाळून पाणी वेगळे करून घ्या. 2. तयार केलेल्या गोखरणाच्या निळ्या पाण्यात साखर आणि चिमूटभर मीठ घाला. त्यामध्ये तांदळाचे पीठ घालून व्यवस्थित एकजीव करा आणि त्याची उकड काढून घ्या. 3. उकड थोडी कोमट झाल्यावर ती व्यवस्थित मळून मऊ आणि लवचिक पीठ तयार करून घ्या. 4. आता सारणासाठी कढईत तूप,नारळ, गूळ, खसखस, ड्रायफ्रूट्स, वेलची पूड आणि जायफळ पूड घालून व्यवस्थित परतून घ्या. सारण तयार झाल्यावर ते थंड होऊ द्या. 5. तयार पिठाचा छोटा गोळा घेऊन त्याची मोदकाची वाटी तयार करा. त्यामध्ये तयार केलेले सारण भरून मोदकाला योग्य आकार द्या. 6. मोदक मऊ राहण्यासाठी आणि त्याला सुंदर चमक येण्यासाठी तयार मोदक हलकेच पाण्यात बुडवून घ्या आणि ताटात ठेवून द्या. 7. अशा प्रकारे सर्व मोदक तयार करून घ्या. नंतर वाफवताना मोदक एकमेकांवर ठेवू नका, जेणेकरून ते व्यवस्थित शिजतील आणि एकमेकांना चिकटणार नाहीत. 8. तयार झाले तुमचे नैसर्गिक निळ्या रंगाचे, सुंदर, मऊ आणि स्वादिष्ट गोखरणाच्या फुलांचे मोदक! 💙🌸 गोखरणाच्या फुलांचे हे मोदक त्यांच्या नैसर्गिक रंगामुळे आकर्षक तर दिसतातच, शिवाय गोखरणाच्या फुलांच्या पारंपरिक वापरामुळे त्यांना विशेष महत्त्व आहे. तुम्हीसुद्धा ही सुंदर आणि वेगळी रेसिपी नक्की ट्राय करा! 💙✨
- Kind
- Recipe
- Place
- Raigad
- Art
- Cooking (Citra-śāka-pūpa-bhakṣya-vikāra-kriyā) · Kala 42
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 21 September 2026
- Accepted
- 21 September 2026
Evidence
This entry is record #4293 in a hash chain of 4,293. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash00dcc39072aeeca7c15342093d08b53c46f1f00288559618cb70673f4522730a
Chain head00dcc39072aeeca7c15342093d08b53c46f1f00288559618cb70673f4522730a
The chain verifies end to end as of this page load.


