bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-04264
सहा वर्षांची परंपरा… आणि यावर्षी बाप्पाच्या रूपात आमच्या लेकीचं प्रतिबिंब!
सहा वर्षांपूर्वी एक छोटीशी सुरुवात झाली… ❤️ गणपती बाप्पाची मूर्ती बाजारातून आणायची नाही, तर आपल्या हाताने, शाडूच्या मातीपासून घडवायची… 🌿🙏🏻 पहिल्या वर्षी फक्त एक प्रयत्न होता… मग हळूहळू तीच आमची परंपरा बनली. 🥹 प्रत्येक वर्षी माती हातात घेताना नवीन बाप्पा घडत गेला… आणि त्याचसोबत आमच्या आठवणीही. ❤️ पण यावर्षीची गोष्ट काहीशी वेगळी होती… कारण यावर्षी आमच्या घरात एक छोटीशी परी आली होती. 👶🏻🌸 तिच्या छोट्याशा हातांसारखे गोंडस हात, तिच्या निरागस चेहऱ्यासारखं गोड हास्य… आणि मग मनात एकच विचार आला— “यावर्षीचा बाप्पा आपल्या लेकीसारखाच असावा…” 🥹💗 आणि म्हणून सहाव्या वर्षी आमच्या हातून साकारला हा छोटासा बाळ गणेशा. 🐘❤️ मातीची मूर्ती आहे… पण त्यात आमच्या सहा वर्षांच्या परंपरेचं प्रेम आहे, आणि आमच्या लेकीच्या आगमनाचा सगळ्यात सुंदर आनंदही आहे. 🌿👶🏻✨ 🙏🏻 गणपती बाप्पा मोरया! 🌿 पर्यावरणपूरक बाप्पा मोरया!
- Kind
- Story
- Place
- Pune
- Art
- Painting (Ālekhyam) · Kala 21
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 21 September 2026
- Accepted
- 21 September 2026
Evidence
This entry is record #4274 in a hash chain of 4,274. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash589ee87f1dce095df4c1f7a824235114f09922fae812f373284df7ae54e067a8
Chain head589ee87f1dce095df4c1f7a824235114f09922fae812f373284df7ae54e067a8
The chain verifies end to end as of this page load.


