bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-04258
उकडीचे मोदक

कृती सारण: कढईत ½ टीस्पून तूप गरम करून त्यात खोबरे आणि गूळ घाला. मंद आचेवर गूळ वितळेपर्यंत शिजवा. वेलची पूड घालून गॅस बंद करा. सारण पूर्ण थंड होऊ द्या. उकड: एका भांड्यात १ कप पाणी, तूप आणि मीठ उकळायला ठेवा. पाणी उकळल्यावर गॅस मंद करा आणि त्यात तांदळाचे पीठ हळूहळू घालत सतत ढवळा व एक चमचा मैदा झाकण ठेवून ५ मिनिटे वाफ येऊ द्या. पीठ कोमट असतानाच मऊसर मळून घ्या. हाताला थोडे तूप लावून पिठाचा छोटा गोळा घ्या आणि पातळ वाटीप्रमाणे पसरवा. त्यात १–१½ चमचा सारण भरा. कडांना पाकळ्या/पारी करून सर्व पाकळ्या वर आणून मोदक बंद करा. मोदकांना तुपाचा हात लावलेल्या चाळणीवर ठेवून १०–१२ मिनिटे वाफवून घ्या.वर एक एक केसर लावा गरमागरम मोदकावर थोडे तूप घालून सर्व्ह करा.
- Kind
- Recipe
- Place
- Palghar
- Art
- Cooking (Citra-śāka-pūpa-bhakṣya-vikāra-kriyā) · Kala 42
- Contributed by
- ashwini raut
- Submitted
- 21 September 2026
- Accepted
- 21 September 2026
Evidence
This entry is record #4268 in a hash chain of 4,268. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash044332da449832d1f8c5ddff9226feee3859b0c817372ed2904c5495a8bf29c1
Chain head044332da449832d1f8c5ddff9226feee3859b0c817372ed2904c5495a8bf29c1
The chain verifies end to end as of this page load.


