bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-04245
गुजरे कुटुंबीय शतक महोत्सव गणेशोत्सव
आजचा हा गणपती उत्सव आमच्यासाठी केवळ एक सण नाही, तर जवळजवळ शंभर वर्षांची एक सुंदर कौटुंबिक परंपरा, श्रद्धा आणि एकजुटीचा वारसा आहे. या परंपरेची सुरुवात झाली ती सीतारामशेट केशवशेट गुजरे यांच्या नवसातून “मला पुत्ररत्न प्राप्त झालं, तर मी माझ्या घरी गणपतीची स्थापना करीन,” असा त्यांनी नवस केला होता. आणि १९२७ साली रामकृष्ण सीताराम शेट गुजरे यांचा जन्म झाला. त्या वर्षापासून गुजरे कुटुंबात गणपतीची स्थापना करण्याची ही परंपरा सुरू झाली. विशेष म्हणजे, ही परंपरा केवळ एका घरापुरती किंवा एका भावापुरती मर्यादित राहिली नाही. कुटुंबातील सर्व भाऊ एकत्र येऊन एकच गणपती साजरा करत आले. काळ बदलला, पिढ्या बदलल्या, घरं बदलली; पण गणपती मात्र एकच राहिला आणि त्याभोवतीचं कुटुंबही एकत्र राहिलं. म्हणूनच हा गणपती आमच्यासाठी श्रद्धेइतकाच एकतेचा आणि आपुलकीचा प्रतीक आहे. आज २०२६ मध्ये आपण या परंपरेच्या शंभराव्या वर्षात पदार्पण करत आहोत. जवळपास एका शतकाचा हा प्रवास आपल्या पूर्वजांनी सुरू केलेल्या श्रद्धेचा, पुढच्या पिढ्यांनी जपलेल्या परंपरेचा आणि संपूर्ण कुटुंबाने जपलेल्या एकजुटीचा साक्षीदार आहे. आजच्या या विशेष प्रसंगी, त्या परंपरेला मनापासून नमन करून आणि पुढच्या अनेक पिढ्यांनीही हा वारसा असाच पुढे न्यावा, हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. गणपती बाप्पा मोरया! गुजरे कुटुंबाच्या शंभर वर्षांच्या गणपती परंपरेचा विजय असो!
- Kind
- Tradition
- Place
- Thane
- Art
- The Art of Memory (Dhāraṇā-mātṛkā) · Kala 62
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 21 September 2026
- Accepted
- 21 September 2026
Evidence
This entry is record #4255 in a hash chain of 4,256. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash4874fce2ef37c103b9c2f9be81b6fbbc941aee6a28d85f308d693b6de1e9dc97
Chain headd8bb6f1eaf8e7bc7588ba9ed4b93964880f1f521c21e6d4abe3b3b70e2e9b5ce
The chain verifies end to end as of this page load.


