bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-03980
गणेश विसर्जन
🌺 काल्हेर गावाचे गणेशोत्सव : भक्तीच्या रंगात रंगलेली एकजुटीची परंपरा* 🌺 काल्हेर गाव, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे — विविधतेतून एकता जपणारे आणि आपल्या परंपरांचा अभिमानाने वारसा पुढे नेणारे हे गाव. काल्हेर ची ओळख एखाद्या एका वैशिष्ट्यापुरती मर्यादित नाही. गावकऱ्यांमधील जिव्हाळा, सामाजिक एकोपा, क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी आणि कलाविष्काराची परंपरा यामुळे या गावाने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. गणेशोत्सव आला की या एकतेला आणखी सुंदर रूप प्राप्त होते. घराघरांत बाप्पाचे आगमन होते, प्रत्येक कुटुंब आपापल्या पद्धतीने गणरायाची आराधना करतात त्याच प्रमाणे देशाच्या कानकोपऱ्यातून गावामधील निवासी सॊसायटी मध्ये राहायला आलेले विविध प्रांतातील, विविध जातीधर्माचे, भिन्न बोली बोलणारे, भिन्न संस्कृती असणारे सर्व लोक गावामधील स्थानिकांप्रमाणेच एकत्र येऊन विविध सण उत्सव साजरे करत असतात त्याच प्रमाणे आप आपल्या सोसायटी मध्ये गणेशोत्सवादरम्यान गणरायाची स्थापना करून दीड दिवसापासून ते दहा दिवसापर्यंत गणेशाची मोठया भक्तीभावाने सेवा व आराधना करतात त्याच प्रमाणे या दिवसात विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात येतात. 🛕“ काल्हेर ची उत्सवाची पद्धत गावाच्या सामाजिक एकतेचे प्रतीक आहे. गावामध्ये दरवर्षी ग्राम देवातेच्या मंदिरामध्ये अखंड हरीनाम सप्ताह आयोजित करण्यात येतो त्या कार्य क्रमात गावातील स्त्री, पुरुष, जेष्ठ नागरिक, युवक लहान मुळे, एकत्र येऊन मंदिरामध्ये सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये भाग घेतात तसेच सप्ताह काळात मंदिरामध्ये दररॊज अन्नदान केले जाते त्या अन्नदानासाठी व इतर कार्यक्रमांसाठी येणारा खर्च व मेहनत गावकरी स्वतः मिळून करत असतात. यंदा या सप्ताह सोहळ्याला 107 वर्षे पूर्ण झाली. यासारखे असंख्य कार्यक्रम गावामध्ये जेष्ठ मंडळीच्या मार्गदर्शनाखाली एकोप्याने व गुण्यागोविंदाणे शेकडो वर्षांपासून ते आजतागायत अविरत व अखंडित पणे सुरु आहेत. त्याच प्रमाणे गावामधील गणेशोत्सवाला देखील एक आगळीवेगळी परपरा लाभली आहॆ. गावामधील गणेशोत्सव जसा घरगुती व परपरिक आहॆ त्याच प्रमाणे सार्वजनिक व आधुनिक ही आहॆ. गणेशोत्सवाच्या निमित्ताने घराघरातील, व मनामनातील भेद बाजूला राहतात आणि संपूर्ण गाव एका कुटुंबाप्रमाणे एकत्र येते. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत, महि
- Kind
- Story
- Place
- Thane
- Art
- Rules of Discipline (Vainayikī vidyā) · Kala 63
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 21 September 2026
- Accepted
- 21 September 2026
Evidence
This entry is record #3990 in a hash chain of 3,990. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash80771e4c8833d5bc5f18525802cfddcdcab34447da3f6aa3b02ec4f7d5e105f7
Chain head80771e4c8833d5bc5f18525802cfddcdcab34447da3f6aa3b02ec4f7d5e105f7
The chain verifies end to end as of this page load.


