bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-03976
डुंगे गावातील गणेशोत्सव

भिवंडी तालुक्यातील डुंगे हे ग्रामीण भागातील पारंपरिक आणि गावपण जपणारे एक महत्त्वाचे गाव आहे. ठाणे व भिवंडी परिसरातील इतर ग्रामीण भागांप्रमाणेच डुंगे गावात गणेशोत्सव मोठ्या भक्तिभावाने, उत्साहाने आणि एकोप्याने साजरा केला जातो. सणाची वैशिष्ट्ये व पूजनप्राणप्रतिष्ठा: गणेश चतुर्थीच्या दिवशी मातीच्या आकर्षक मूर्तीची घरात किंवा सार्वजनिक मंडपांमध्ये प्रतिष्ठापना केली जाते. पूजा व नैवेद्य: बाप्पाची रोज सकाळ-संध्याकाळ आरती, पूजा केली जाते. गणपती बाप्पाला मोदक, दुर्वा, आणि जास्वंदीचे फूल अत्यंत प्रिय आहेत. सांस्कृतिक कार्यक्रम: सार्वजनिक मंडळामध्ये भजन, कीर्तन, नाटक, नृत्य आणि सामाजिक उपक्रम आयोजित केले जातात. गणेशोत्सवाचे दिवस संपूर्ण गावात एक वेगळीच अध्यात्मिक ऊर्जा प्रवाहित होत असते. दररोज संध्याकाळी होणारा हरिपाठ, भक्तिमय सुरांमध्ये रंगणारे भजन, प्रबोधनात्मक कीर्तन आणि मूल्यांची शिकवण देणारे प्रवचन यांसारख्या अध्यात्मिक कार्यक्रमांमुळे गावातील वातावरण भक्तीने भाऊन जाते. विसर्जन सोहळा १० दिवस भक्तिभावाने पूजा केल्यानंतर, अनंत चतुर्दशीच्या दिवशी "गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या" असा जयघोष करत वाजत-गाजत मूर्तीचे विसर्जन स्थळी विसर्जन केले जाते.
- Kind
- Story
- Place
- Thane
- Art
- Choral Recitation (Sampāṭhya) · Kala 5
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 21 September 2026
- Accepted
- 21 September 2026
Evidence
This entry is record #3986 in a hash chain of 4,069. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash2d8797ff206031ec3aa4e45b142aa8ee54a0ec33bd1289719ce220e6eaf83905
Chain head5bcf00014071633927e722e29be727fcafd335df265fe98ff9ac3559e2fd9495
The chain verifies end to end as of this page load.


