bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-03946
ग्रामपंचायत कशेळी गणेशोत्सव २०२६

श्री गणेश चतुर्थी हे भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्ष चतुर्थीला केले जाणारे एक धार्मिक व्रत आहे. गणेश चतुर्थी या दिवसाला महासिद्धीविनायकी चतुर्थी किंवा "शिवा" असेही म्हणले जाते. या चतुर्थीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आणि स्थान आहे. असे मानले जाते की, गणेशाला प्रसन्न केल्याने घरात सुख समृद्धी आणि शांती प्रस्थापित होते. गणेशाला मोदक खूप आवडतात.म्हणूनच गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेशाला मोदकांचा नैवेद्य अर्पण केला जातो, त्याचप्रमाणे जास्वंदीचे फुल,शमी पत्री आणि दुर्वा या ही खूप आवडीच्या असल्यामुळे त्याही अर्पण केल्या जातात. उंदीर हे गणेशाचे वाहन आहे.स्त्रीमनाचे लोकदैवत असे ही श्री गणेशाला मानतात.श्री गणेश चतुर्थीच्या पहिल्या दिवशी गणपतीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते आणि गणपतीच्या पूजेनंतर आरती केली जाते. प्रमुख्याने माती पासूनच बनवलेल्या गणेश मूर्तिचे पूजन केले जाते.
- Kind
- Story
- Place
- Thane
- Art
- Rules of Discipline (Vainayikī vidyā) · Kala 63
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 21 September 2026
- Accepted
- 21 September 2026
Evidence
This entry is record #3956 in a hash chain of 3,956. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash491694988da188d8d70ccafa7a984618e51a935607dc9b737de01d407ec5c4b3
Chain head491694988da188d8d70ccafa7a984618e51a935607dc9b737de01d407ec5c4b3
The chain verifies end to end as of this page load.


