bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-03940
खऱ्या अर्थाने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे अशी अगणित आहेत. पण आमचे मंडळ सर्वात वेगळे आणि खऱ्या अर्थाने लोकमान्य टिळकांना अभिप्रेत आहे असे आहे. सुरुवात करायची झाल्यास मंडळाचे सदस्य हे वेगवेगळ्या जाती पंथाचे आहेत आणि दर वर्षी मंडळाची कार्यकारिणी बदलली जाते. त्यामुळे कोणी एक व्यक्ती वर्षाने वर्ष एकाच पदावर नसतो त्यामुळे इतर सदस्यांना पण आपल्या मध्ये असलेले संघटनेचे कौशल्य दाखवायची संधी भेटते, आणि हे झालेले आहे अनेक तरुण चांगल्या तऱ्हेने आपल्या पदाची जबाबदारी सांभाळतात. दुसरे सांगायचे झाल्यास मंडपासाठी लागणारे सर्व साहित्य (वासे, बांबू, तळपत्री, आतील कपडा, पंखे, लाईट, खुर्च्या, साउंड सिस्टीम, विसर्जन ट्रॉली) स्वतः मंडळाचे आहे. तिसरा महत्वाचा मुद्दा असा कि हे सर्व (50फूट ×50 फूट) मंडप उभारण्यासाठी कुठल्याच प्रकारचा मजूर घेतला जात नाही. सर्व सदस्य आपला वेळ काढून सलग 25 दिवसांनी हा डोलारा उभा करतात. डेकोरेशन आणि इलेक्ट्रिक चे काम देखील सभासदांपैकी केले जाते. चौथा मुद्दा असा कि आपण बघतो कि सर्व मंडळामध्ये सत्यनारायणाची पूजा असतें त्या दिवशी भंडारा असतो, पण आमच्या मंडळात हे असतेच पण पहिल्या दिवसापासून ते अनंत चतुर्दशी पर्यंत दररोज रात्रीचे 60 ते 70 जणांसाठी जेवण असतें. याचे कारण असे कि सदस्य हे कामावरून आल्यानंतर मंडपातच असतात. आणि सर्व फॅमिली ही तेथेच असतें त्यामुळे घरी कोणीच जात नाही, संध्याकाळी मधुर भाजणांचे कार्यक्रम असतात तेथेही व्यवस्था बघावी लागते त्यामुळे घरी जाणे होत नाही. शेवटी हेच सांगेन कि लोकमान्य टिळकांनी जे उत्सव सुरु केले ते समाज एकत्र येण्यासाठी.
- Kind
- Story
- Place
- Thane
- Art
- Rules of Discipline (Vainayikī vidyā) · Kala 63
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 21 September 2026
- Accepted
- 21 September 2026
Evidence
This entry is record #3950 in a hash chain of 3,951. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash74f2298f8137dbc18d78f80efacd903e67dee4e85ef667b3788e49dcdefbbd6c
Chain head78687234d5a8c84f91e0ef19dcffd4a977639910e6b5ed31686b4d375de154fa
The chain verifies end to end as of this page load.


