bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-03843
नवसाचा बाप्पा

सव्वीस वर्षापूर्वी घरी अपत्य म्हणून सर्व मुलीच होत्या, आईने सांगितले नुसार अष्टविनायक यात्रा केली. घरी एकच बाप्पाची मुर्तीची प्रतिष्ठापना होत होती. आईने अष्टविनायकला आमचे घरी पोरगं होऊ दे बाप्पा ... तुझ्या नावे बालगणेश ( छोटी बाप्पाची मुर्ती ) दरवर्षी स्थापन करूत, असा नवस बोलली. आणि अष्दटविनायक दर्शना नंतर आज्जीच्या मांडीवर "लौकिक पाठक" खेळू लागला. आईने बोलल्या प्रमाणे आम्ही गेल्या पंचेवीस वर्षापासुन दोन मुर्तीची गणेश चतुर्थीला स्थापना सुरू झाली. म्हणूनच मग घरी कुणालाही नातू झाला की बाल गणेश स्थापन करणेची आता परंपराच पाळतात. गणपती बाप्पा मोरया.. ..!
- Kind
- Story
- Place
- Parbhani
- Art
- Rules of Discipline (Vainayikī vidyā) · Kala 63
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 21 September 2026
- Accepted
- 21 September 2026
Evidence
This entry is record #3853 in a hash chain of 3,853. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashcf85e8cdc7d8a4965f834440100a580392c44cd1a2e748edc690057ac75229b4
Chain headcf85e8cdc7d8a4965f834440100a580392c44cd1a2e748edc690057ac75229b4
The chain verifies end to end as of this page load.


