bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-03830
ग्रामपंचायत सोनाळे

ग्रुप ग्रामपंचायत सोनाळे निसर्गरम्य अशा डोंगर रांगांच्या सोनाळे गाव ता. भिवंडी जि. ठाणे पायथ्याशी व नदिच्या तीरावर वसलेले हे गाव धार्मीक आणि अध्यात्मीक क्षेत्रात नेहमीच तत्पर असते. प्रसिध्द अशा चेन्या डोंगरावरील पुरातन दिडेश्वर महादेवाच्या मंदिराचा वारसा लाभलेल्या गावाची ओळख फक्त नैसर्गीक सौर्यापुरती मर्यादीत नसुन गावातील नागरीकांमधील सामाजीक एकोपा, किडाक्षेत्रातील युवकांची उल्लेखनीय कामगीरी तसेच शाळेतील मुलांच्या कला गुणांमुळे नेहमीच प्रतीत होत असते. गणेशोत्सवात तर गावामध्ये भक्तीमय वातावरणाची निर्मीती होत असते. गावातील अनेक घरामध्ये गणपती बाप्पाचे आगमन होते. सर्व गवकरी एकमेकाच्या घरी दर्शना करीवा जात असतात त्या निमीत्ताने एकमेकांप्रती प्रेम आपलकीची भावना वाढीस लागते. गावातील गणपती असणा-या प्रत्येक घरात गावातीलच हरीपाठ मंडल, भजन मंडळ, महिला मंडल याजमार्फत वारंवार धार्मीक कार्यक्रम करून गणपती बाप्पाची पूजा केली जाते. यावेळी गावातील लोक आपापसातील मतभेद विसरून गणपती बाप्पाच्या भक्तीत लीन होत असतात. या सणामुळे गावाला एकतेचे व आपलकीचे नविन रूप जण लाभलेले असते. गावातील नागरीकांच्या घरात विराजमान होणा-या साइमातीच्या मणेरा मुर्ती मुळे पर्यावरणाची काळजीही घेतली जाते. अनेक नागरीक तर नेसभीक साधन सामग्रीचा वापर करून मस्वर सजावट करीत असतात ज्यामुळे अविघटनशील पदार्थाचा वापर करून पर्यावरणाला हानी पोचवणा-या घतकांच्या वापरास आला घावला जातो. निसर्गाच्या सानिध्यात राहुन त्याची जपवणूक करण्याची ही परंपरा पूर्वापार सोलाले गावा मार्फत जपली जाते.
- Kind
- Story
- Place
- Thane
- Art
- Choral Recitation (Sampāṭhya) · Kala 5
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 21 September 2026
- Accepted
- 21 September 2026
Evidence
This entry is record #3840 in a hash chain of 3,841. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashaff90783909b1407428466a8da1cc7d1af2dbd2266cdfb86586872bee0d42dfa
Chain head454156dc04a71c5ee3c45fdcb2e68df1af4270de15f862583a66dee6e4e6ff27
The chain verifies end to end as of this page load.


