bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-03730
पिंपळगाव पिंपळघरचे गणपती

माझ्या पिंपळगाव पिंपळघर गावच्या काही परंपरा पिंपळगाव पिंपळघर गाव हे भिवंडी तालुक्यातील सुप्रसिद्ध गाव आहे आमच्या गावात गणपती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो या उत्सवात लहान थोर महीला पुरुष सर्व आनंदाने या उत्सवात सहभागी होतात आणि गणपती सण मोठ्या आनंदाने साजरा करतात गणपती मध्ये भजन किर्तन हरिपाठ नाच गाणे इत्यादी कार्यक्रम आयोजित करण्यात येतात आणी आमच्या गावची ओळख म्हणजे वारकरी संप्रदाय मध्ये अग्रगण्य आसे गाव आहे आमच्या गावामध्ये आनेक कलाकार आहेत गायक वादक तसेच किर्तनकार आणी कबड्डी मध्ये आमचं गाव खुप वर्षांपासून ची परंपरा आहे आमच्या गावच वैशिष्ट्य म्हणजे आमच्या गावालगत भातसानदी वाहते खुप निसर्गरम्य परिसर आहे आणी गावात गणपती मध्ये भक्तीमय वातावरण निर्माण होतो प्रत्येक घरोघरी जाऊन आणी भजन केले जाते ही जुनी परंपरा खुप वर्षांपासून आहे आमच्या गावात सर्व लोक एकत्रित येऊन आणी गणपती बाप्पाला निरोप देत असताना गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या या घोषाने सर्व लोक गणपतीला निरोप देतात असं आमच्या गावाची परंपरा आता पर्यंत सर्वांनी जपली आहे शब्दांकन, श्री.विशाल मनोहर शेलार ग्रामविकास अधिकारी पिंपळगाव पिंपळघर
- Kind
- Story
- Place
- Thane
- Art
- Choral Recitation (Sampāṭhya) · Kala 5
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 21 September 2026
- Accepted
- 21 September 2026
Evidence
This entry is record #3740 in a hash chain of 3,740. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hasha9df451101e1436be9465a9c34795fc111d45e1ed2fafcfe6d3afec558307915
Chain heada9df451101e1436be9465a9c34795fc111d45e1ed2fafcfe6d3afec558307915
The chain verifies end to end as of this page load.


