bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-03696
ग्रामपंचायत दाभाड

आमच्या गावात गणपती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो या उत्सवात लहान थोर महीला पुरुष सर्व आनंदाने या उत्सवात सहभागी होतात आणि गणपती सण मोठ्या आनंदाने साजरा करतात गणपती मध्ये भजन किर्तन हरिपाठ नाच गाणे इत्यादी कार्यक्रम आयोजित करण्यात येतात आणी आमच्या गावची ओळख म्हणजे वारकरी संप्रदाय मध्ये अग्रगण्य आसे गाव आहे आमच्या गावामध्ये आनेक कलाकार आहेत गायक वादक तसेच किर्तनकार आणी कबड्डी मध्ये आमचं गाव खुप वर्षांपासून ची परंपरा आहे आमच्या गावच वैशिष्ट्य म्हणजे आमच्या गावालगत भातसानदी वाहते खुप निसर्गरम्य परिसर आहे आणी गावात गणपती मध्ये भक्तीमय वातावरण निर्माण होतो प्रत्येक घरोघरी जाऊन आणी भजन केले जाते ही जुनी परंपरा खुप वर्षांपासून आहे आमच्या गावात सर्व लोक एकत्रित येऊन आणी गणपती बाप्पाला निरोप देत असताना गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या या घोषाने सर्व लोक गणपतीला निरोप देतात असं आमच्या गावाची परंपरा आता पर्यंत सर्वांनी जपली आहे
- Kind
- Story
- Place
- Thane
- Art
- Choral Recitation (Sampāṭhya) · Kala 5
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 21 September 2026
- Accepted
- 21 September 2026
Evidence
This entry is record #3706 in a hash chain of 3,706. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash47159bdcdc90e5a842eab4ff13931fb709f4de493bab8d7b2cc8f132a27142d5
Chain head47159bdcdc90e5a842eab4ff13931fb709f4de493bab8d7b2cc8f132a27142d5
The chain verifies end to end as of this page load.


