bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-03656
पुर्णा ग्रामपंचायत चा गणेश उत्सव हा दीड, पाच, दहा दिवस पर्यत साजरा केला जातो.

गणपती बाप्पा म्हटलं की मनात भक्ती, उत्साह, आनंद आणि आपल्या माणसांसोबत घालवलेले सुंदर क्षण आठवतात पुर्णा गाव हे भिवंडी तालुक्यातील सुप्रसिद्ध गाव आहे आमच्या गावात गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या उत्सवात लहान थोर महीला पुरुष सर्व आनंदाने या उत्सवात सहभागी होतात आणि गणपती सण मोठ्या आनंदाने साजरा करतात गणपती मध्ये भजन किर्तन हरिपाठ नाच गाणे व अशे अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात व आमच्या गावची ओळख म्हणजे वारकरी संप्रदाय मध्ये अग्रगण्य आसे गाव आहे आमच्या गावामध्ये आनेक कलाकार आहेत गायक वादक तसेच किर्तनकार त्यामुळे आमच्या गावात नेहमी आनंदाचा व भक्तिमय वातावरण असतो , आणी गावात गणपती मध्ये घरोघरी जाऊन भजन केले जाते ही जुनी परंपरा खुप वर्षांपासून आहे आमच्या गावात सर्व लोक एकत्रित येऊन आणी गणपती बाप्पाला निरोप देत असताना गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या या घोषाने सर्व लोक गणपतीला निरोप देतात असं आमच्या गावाची परंपरा आता पर्यंत सर्वांनी जपली आहे.
- Kind
- Story
- Place
- Thane
- Art
- Choral Recitation (Sampāṭhya) · Kala 5
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 21 September 2026
- Accepted
- 21 September 2026
Evidence
This entry is record #3666 in a hash chain of 3,666. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash28517fff62d4242724cc6c2828fd03d259407248ce603c769661ba8d8b7e161c
Chain head28517fff62d4242724cc6c2828fd03d259407248ce603c769661ba8d8b7e161c
The chain verifies end to end as of this page load.


