bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-03650
ग्रामपंचायत राहुर गणेशोत्सव
गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा, लाडका आणि आनंदाचा सण आहे. राहुर गावचा गणेशोत्सव म्हणजे श्रद्धा, भक्ती आणि एकजुटीचा उत्सव.आमच्या गावात गणपती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो या उत्सवात लहान थोर महीला पुरुष सर्व आनंदाने या उत्सवात सहभागी होतात आणि गणपती सण मोठ्या आनंदाने साजरा करतात गणपती मध्ये भजन हरिपाठ नाच गाणे इत्यादी कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. आमच्या गावच वैशिष्ट्य म्हणजे आमच्या खुप निसर्गरम्य परिसर आहे आणी गावात गणपती मध्ये भक्तीमय वातावरण निर्माण होतो प्रत्येक घरोघरी जाऊन बाप्पाची आरती केली जाते.ही जुनी परंपरा खुप वर्षांपासून आहे आमच्या गावात सर्व लोक एकत्रित येऊन आणी गणपती बाप्पाला निरोप देत असताना गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या या घोषाने सर्व लोक गणपतीला निरोप देतात असं आमच्या गावाची परंपरा आता पर्यंत सर्वांनी जपली आहे.
- Kind
- Story
- Place
- Thane
- Art
- Choral Recitation (Sampāṭhya) · Kala 5
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 21 September 2026
- Accepted
- 21 September 2026
Evidence
This entry is record #3660 in a hash chain of 3,660. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash36b304e0be9958c0d14f8c03101b810148a5c09c7f0bf04673ba2ad788916f14
Chain head36b304e0be9958c0d14f8c03101b810148a5c09c7f0bf04673ba2ad788916f14
The chain verifies end to end as of this page load.


