bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-03614
🙏🏼आमच्या घरातील बाप्पा 🙏🏼
तसे बघितले तर आमचा बाप्पा हा गावी होता माझे गावं 'वर्षी ' धुळे जिल्हा. म्हणजे गेली 20-22 वर्ष झाले गणपती गावी बसवायचो आणि वीसर्जन अनंत चतुर्थीला.आई बाबा मोठा भाऊ दादा, आणि मी. आम्ही उत्साहाने बसवायचो सजावट डोंगर, कधी कधी आर्मी थिम असे बऱ्याच प्रकारे वेग वेगळी सजावट असायची . खरेतर आमच्याकडे दोन गणपती असायचे एक मागीलवर्ष्याचा आणि एक नवीन मग गेल्या वर्षाचा गणपती बोळवायचा अनंत चतुर्थी ला आणि नवीन बाप्पा वर्षभर पूजा घरात सांभाळून ठेवायचा मग पुढील वर्षी नवीन गणपती अशी आमच्याकडे प्रथा होती.पण बाबा गेले, आणि मग माझ्या लग्नानंतर मला मुलगी झाली 😍.. तेही चतुर्थी च्या दिवशी 29/05/2021 ला 🥳. मग नंतर आईसुद्धा गेली 😔.गावी मोठा भाऊ एकटा असल्याने मग आम्ही गणपती इथे पुण्यात आणून बसवायचे ठरवले.पण मग ती दोन गणपती ची प्रथा आम्ही थांबवून दरवर्षी नवीन गणपती आणि त्याचवर्षी बाप्पाचे विसर्जन असे आता आम्हाला हे दुसरे वर्ष आहे 😊. आणि विशेष म्हणजे दरवर्षी बाप्पाची मूर्तीची निवड ही माझी मुलगी ध्येयांशी च करणार 🤩. या वर्षी पण ह्या बाप्पाच्या मूर्तीची निवड तिनेच केली. 🐀मुशक असलेला बाप्पा 🙏🏼. आणि हो हे जे काही सजावट आहे ती सगळी idea माझी मुलगी आणि माझी बायको या दोघांची idea आहे 😍. या गणपती सणात आम्ही पूर्ण कुटुंब एकत्र येऊन हा सण साजरा करतो 🥳. मग तुम्ही सांगा कशी वाटली तुम्हांला आमची story. आणि 🙏🏼🥳आमच्या घरातील बाप्पा 🙏🏼🥳... 🙏🏼🚩गणपती बाप्पा मोरया 🙏🏼🚩.
- Kind
- Story
- Place
- Pune
- Art
- Arranging a Chamber (Śayana-racanā) · Kala 41
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 21 September 2026
- Accepted
- 21 September 2026
Evidence
This entry is record #3625 in a hash chain of 3,986. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hasha2b7c45fb79a2d1ee78056c6e83a0a3110d0df286023e09bd72252612879223c
Chain head2d8797ff206031ec3aa4e45b142aa8ee54a0ec33bd1289719ce220e6eaf83905
The chain verifies end to end as of this page load.


