bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-03599
संस्कृती, श्रध्दा आणि परंपरा जपणारा कुकसे गावातील गणेशउत्सव

संस्कृती, श्रद्धा आणि ऐक्याचा अनोखा संगम , कुकसे गावाचा आदर्श गणेशोत्सव म्हणजे केवळ एक सण नाही, तर तो सांस्कृतिक जपणूक, अध्यात्मिक ऊर्जा आणि सामाजिक एकतेचा भव्य सोहळा असतो. भिवंडी तालुक्यातील कुकसे ग्रामपंचायत हद्दीतील हेच विलोभनीय रूप दरवर्षी श्री गणरायाच्या आगमनाने अधिकच उजळून निघते. कुकसे ग्रामपंचायतीच्या हद्दीत कुकसे,भोईरगाव, बोरिवली,जांभूळपाडा-उसरोली,वाकीपाडा-भावाले महसूल गावांचा समावेश आहे. भौगोलिकदृष्ट्या विविध भागात पसरलेले हे सर्व गाव-पाडे गणेशोत्सवाच्या काळात मात्र एकाच भक्तीच्या आणि ऐक्याच्या धाग्यात घट्ट बांधले जातात. गावातील लहान-थोर, महिला आणि सर्व जाती-धर्माचे ग्रामस्थ एकत्र येऊन आपल्या लाडक्या गणरायाची अत्यंत श्रद्धेने व भक्तिभावाने पूजा-अर्चा करतात. 🌻🛕अध्यात्मिक तेजाने उजळून निघणारे वातावरण
- Kind
- Tradition
- Place
- Thane
- Art
- Rules of Discipline (Vainayikī vidyā) · Kala 63
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 21 September 2026
- Accepted
- 21 September 2026
Evidence
This entry is record #3609 in a hash chain of 3,610. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash4c28268b92d445c2a9da9531164ed405fef2a6e852be77d67922bd6363d0844b
Chain head2bb552c127249e4c7b4867bd99d6b0bbf203c7cbc88b45a7a74aa64f3b68c12f
The chain verifies end to end as of this page load.


