bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-03598
🙏🏻 पाटील कुटुंबीयांचा बाप्पा ❤️
🙏🏻 पाटील कुटुंबीयांचा बाप्पा ❤️ मूळचे सर्वेभाद्री गावचे आम्ही पाटील कुटुंबीय… नोकरीनिमित्त कोणी मुंबईत, तर कोणी पेणला वास्तव्यास असतो. प्रत्येकाची वाट वेगळी झाली असली, तरी बाप्पाच्या भक्तीची ओढ मात्र सगळ्यांना पुन्हा एकत्र आणते. बाप्पाच्या आगमनाच्या तयारीसाठी तब्बल एक महिना आधीच सगळे जण आवर्जून एकत्र येतात. प्रत्येकजण आपल्या परीने खारीचा वाटा उचलतो आणि बाप्पाच्या आगमनाची तयारी मनापासून करतो. मग येतो तो आपल्या लाडक्या बाप्पाचा आगमनाचा दिवस… घरात आनंद, उत्साह आणि भक्तीचं वातावरण निर्माण होतं. काही दिवस बाप्पाच्या सहवासात कसे निघून जातात, हे कळतही नाही. आणि शेवटी विसर्जनाच्या वेळी डोळ्यांत पाणी आणि मनात एकच भावना… “बाप्पा, पुढच्या वर्षी लवकर या!” बाप्पाला निरोप देताना पुन्हा प्रत्येकजण आपापल्या वाटेने निघतो… पण मन मात्र पुढच्या वर्षीच्या बाप्पाच्या आगमनाची वाट पाहत राहतं. हीच आमची परंपरा… हीच आमची एकजूट… आणि हाच आमच्या पाटील कुटुंबीयांचा बाप्पा! 🌺 गणपती बाप्पा मोरया! पुढच्या वर्षी लवकर या! 🌺
- Kind
- Story
- Place
- Raigad
- Art
- Rules of Discipline (Vainayikī vidyā) · Kala 63
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 21 September 2026
- Accepted
- 21 September 2026
Evidence
This entry is record #3608 in a hash chain of 3,785. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash1812c1c652ee3be3c332d61d3f5076122e6c064c3fca5137cf6cb913b37717be
Chain headdb9164d4eb1b28bec53f774d7c6f6bd5c7d4d29d7d0be419d86a3cbee4956ee6
The chain verifies end to end as of this page load.


